शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे

By प्रविण मरगळे | Updated: April 7, 2026 17:37 IST

साक्षीदार, पीडित यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी पीडित आणि त्यांच्या कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता अशी माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.

नाशिक - भोंदू अशोक खरात विरोधात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झालेत. त्यातील ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. दैवीशक्ती असल्याचं भासवून आरोपी खरात महिलांचे लैंगिक शोषण करायचा. मंदिर परिसरात हातचलाखीचा वापर करून समाजात अंधश्रद्धा पसरवायचा. शिवाय कुटुंबात मृत्यूची भीती दाखवून महिलांना धमकावत असल्याचं समोर आले आहे. या प्रकरणात ३० साक्षीदार, पीडितांची चौकशी सुरू आहे. या महिलांची कुठेही ओळख पटणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन करत एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी खरात प्रकरणात महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली. 

नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत SIT प्रमुख तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरणात एकूण ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. एकूण २४ जणांचे पथक या गुन्ह्यांचा तपास करत आहे. खरातवर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात मिळून एकूण १२ गुन्हे दाखल झालेत. या १२ पैकी ९ गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे आहे. २ गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत. एसआयटीकडील गुन्ह्यांपैकी ८ गुन्हे महिला लैंगिक अत्याचाराचे आहेत तर उर्वरीत ३ गुन्हे फसवणूक, अंधश्रद्धाविरोधी कायदा, सावकारी अधिनियम २०१४ याप्रमाणे दाखल आहेत. आजपर्यंतच्या तपासात ३० पेक्षा अधिक साक्षीदारांकडे विचारपूस केली आहे. साक्षीदार, पीडित यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी पीडित आणि त्यांच्या कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी या सगळ्या गोष्टींची भीती दाखवत होता आणि यातून पैसा उकळत होता असं त्यांनी सांगितले. 

तसेच आरोपी अशोक खरात महिलांना दैवीशक्ती असल्याचे भासवत होता. त्यांच्या कुटुंबात मृत्यूची भीती दाखवून आणि बदनामी करण्याची धमकी देऊन महिलांचे लैंगिक शोषण करत होता. त्याचप्रकारे ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात हातचलाखी करून स्वत:कडे दैवीशक्ती असल्याचं सांगत समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत होता. महिला अत्याचाराबाबत पीडित महिला आणि त्यांचे कुटुंब अतिशय धाडसाने समोर आलेत आणि त्यांनी फिर्याद दाखल केल्याने आरोपीवर कायदेशीर कारवाई करू शकत आहे. लोक काय म्हणतील या भीतीने या महिलांनी अन्याय सहन केला आहे. त्यामुळे या महिलांची ओळख पटू न देणे, त्यांचे व्हिडिओ न पसरवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. हायकोर्टानेही तसे निर्देश दिले आहेत. पीडितांची ओळख पटणार नाही ही भूमिका तपास यंत्रणाची आहे. पीडिता आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मुलाखती घेऊ नये असं आवाहन तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. 

४०-४५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित ४ हजाराहून अधिक लिंक्स SIT तपास पथकातील सायबर विभागाने शोधल्या आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणारी ४९१ अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहेत. SIT कडील तपास संवेदनशील असल्याने अधिक माहिती देऊ शकत नाही. १७ मार्च २०२६ रोजी या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ६० दिवसांत दोषारोपपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पुढील ४०-४५ दिवसांत ८ गुन्ह्यांचा तपास पूर्ण होईल. पीडितांना मनस्ताप होणार नाही याची समाज म्हणून आपण काळजी घेऊया असंही तेजस्वी सातपुते यांनी म्हटलं. 

खरातच्या सहआरोपींवर होणार कारवाई?

सध्या फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याअनुषंगाने तपास सुरू आहे. सहआरोपी कोण आहे याची चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाते. मुख्य आरोपी सोडून जर यात कारणीभूत कुणी असेल, कुणी या गुन्ह्यांसाठी मदत केली असेल तर त्याचा तपास सुरू आहे. पुराव्यानिशी जर काही समोर आले तर निश्चित त्यावर कारवाई करण्यात येईल. तपास जसजसा पुढे जाईल सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. चार्जशीट दाखल होईपर्यंत गोपनीयता बाळगणे गरजेचे आहे असं सांगत तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणात सहआरोपी करणार का या प्रश्नाला उत्तर दिले. त्याशिवाय या प्रकरणात ईडीने आर्थिक व्यवहारांबाबत दखल घेतली आहे. भविष्यात ईडीला पूर्णपणे सहकार्य असणार आहे. भविष्यात अंधश्रद्धेपोटी महिलांचे शोषण घडू नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. या प्रकरणात कुणीही अल्पवयीन नाही. सीडीआर बाबतीत शासन स्तरावर चौकशी होत आहे. त्यात जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल अशी माहितीही तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fake divine power: Ashok Kharat sexually abused women; 30 victims testify.

Web Summary : Ashok Kharat, accused of exploiting women by faking divine powers, faces 12 charges. SIT investigates 11 cases involving sexual abuse and fraud. Thirty victims testified, revealing intimidation and exploitation under the guise of faith. Cyber team removed 491 social media accounts spreading misinformation.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण