शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

३५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण; आरोपीसह १९ वर्षीय मुलीनेही तिच्यासोबत नको तो प्रकार केला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 10:20 IST

अमरावतीमधील घटना

अमरावती : महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक शोषण केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर अन्य एका युवतीच्या मदतीने तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील केवल कॉलनीत १७ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यात मदत करणाऱ्या एका तरुणीसह आरोपी तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

पोलीससूत्रांनुसार, निखिल टिकले (रा. अर्जुननगर) व एक १९ वर्षीय तरुणी असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पूर्वीच्या भांडणातून हा गुन्हा घडला. फिर्यादी ३५ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी फिर्यादीच्या घरात शिरला. त्याने जबरदस्तीने तिचे लैंगिक शोषण केले. या महिलेसोबत आरोपीची ओळख असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

पीडित महिलेला संशय होता की, या गुन्ह्यातील युवतीसोबत पीडितेच्या पतीचे काहीतरी संबंध होते. तसेच ती आरोपीच्या संपर्कात होती. तिने या गुन्ह्यात आरोपीला अनैसर्गिक कृत्य करण्यास प्रत्यक्ष मदत केल्याने पोलिसांनी तिलाही आरोपी केले असून, ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध भादंविची कलम ३७६,३७७,४५२,३५४,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आर. जे चंदापुरे करीत आहेत.

नेमकं काय घडलं-

पीडित महिला व तिचे पती उज्जैन येथे गेले होते. तेथून परत आल्यानंतर तिने पतीचा मोबाइल बघितला. मोबाइलमध्ये या गुन्ह्यातील आरोपी तरुणीचा फोटो दिसला. तुमच्या मोबाइलमध्ये तिचा फोटो कसा असे महिलेने पतीला विचारले त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर पीडितीने त्या तरुणीचा बाबा हॉटेलनजीक शोध घेतला. तिने त्यांचे काही तरी भांडण झाले. त्यानंतर तिचा बदला घेण्याकरिता महिलेने तरुणासोबत प्लॅन रचला. तिचा पती घरी नसताना ते गेले तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. तर तरुणीने तिच्या गुदद्वारात नको तो प्रकार करून अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार पीडितेने गाडगेनगर ठाण्यात नोंदविली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीSexual abuseलैंगिक शोषण