शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला सरपंचाच्या निवासस्थानी देहव्यापार अड्डा; दोन युवतींसह ग्राहक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 13:40 IST

अकोला: शहरालगतच्या गावातील महिलेच्या निवासस्थानी सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर अकोला पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला.

ठळक मुद्दे गावात एका महिलेच्या निवासस्थानी युवतींना आणून देहव्यापाराचा अड्डा चालविल्या जात असल्याची माहिती मिळाली. बनावट ग्राहक तयार करून त्याला गावातील दलाल सुनील नामदेव सरकटे याच्याकडे शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पाठविले. जानेफळ येथील ओमप्रकाश ऊर्फ सचिन विश्वासराव सवडतकर (३४) श्रीकिसन सुखदेव पवार (३६) नको त्या अवस्थेत दिसून आले.

अकोला: शहरालगतच्या गावातील महिलेच्या निवासस्थानी सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर अकोला पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी महिलेच्या निवासस्थानामधून दोन युवती व मेहकर येथील ग्राहकांना पोलिसांनी रंगेहात अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना शहरालगतच्या गावात एका महिलेच्या निवासस्थानी युवतींना आणून देहव्यापाराचा अड्डा चालविल्या जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी पोलिसांचे पथक गठित करण्यात आले. त्यानंतर या पथकाने एक बनावट ग्राहक तयार करून त्याला गावातील दलाल सुनील नामदेव सरकटे याच्याकडे शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पाठविले. मुलीसोबत राहण्याचा दीड हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. त्यानंतर बनावट ग्राहक व दलाल सुनील सरकटे हे दोघे त्या महिलेच्या निवासस्थानी गेले. तेथे दोन युवती होत्या. ग्राहक व दलाल अचानक निवासस्थानी गेल्याने तेथे आधीच उपस्थित असलेले मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील ओमप्रकाश ऊर्फ सचिन विश्वासराव सवडतकर (३४) श्रीकिसन सुखदेव पवार (३६) नको त्या अवस्थेत दिसून आले. बनावट ग्राहकाने दबा धरून बसलेल्या पोलिसांना इशारा करताच पोलिसांनी घरात छापा टाकला. दलालाकडून ४ हजार रुपये जप्त केले. गावातील कुंटणखाना संबंधित महिला चालवत असल्याची कबुली दलालाने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्यासह दोन ग्राहक व महिलेविरुद्ध भादंवि कलम ४,५, ५(१)(सी) ९ अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोन ग्राहक व दलाल या तिघांना यावेळी अटक केली, तर पीडित युवतींची रवानगी सुधारगृहात केली. देहव्यापाराचे मुंबई-पुण्यात धागेदोरेदेहव्यापारात त्या महिलेचा मोठा हातखंडा असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्याकडे येणारे ग्राहक व मुली मुंबई, पुणे, नागपूरमधील असल्याची माहिती आहे. पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही मुली नागपूरमधील असल्याची माहिती असून, त्यांना ग्राहकांच्या डिमांडनुसार बोलावण्यात येते.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हा