लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगरात युनिसेक्स ब्युटी पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या भंडारा येथील एका तरुणासह दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) शुक्रवारी रात्री अटक केली. मिथून भीमराव सरोदे (वय ३०) आणि पूजा रतन नागदेवे (वय २९, रा. सुभाषनगर, कामगार कॉलनी), अशी या सेक्स रॅकेट चालविणाऱ्या आरोपींची नावे आहेत.त्रिमूर्तीनगर मार्गावरील द्रोणाचार्यनगरात मुस्कानवर्षा अपार्टमेंट आहे. येथे पूजा आणि मिथूनच्या जोडगोळीने एक सदनिका भाड्याने घेतली होती. तेथे ते झिडोस स्पा अॅन्ड ब्युटी युनिसेक्स सलून चालवायचे. सलूनमध्ये येणाºया अनेक बड्या घरच्या आंबटशौकीन मंडळींना या दोघांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला-तरुणी उपलब्ध करून देण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. त्याची कुणकुण लागल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाईसाठी सापळा रचला. शुक्रवारी पूजा आणि मिथूनकडे वेगवेगळे ग्राहक पाठवून त्यांना वारांगनांची मागणी करण्यात आली. सायंकाळी या दोघांनी तीन वेश्या उपलब्ध करून दिल्या. ग्राहकांनी संकेत देताच सलूनच्या बाजूलाच दबा धरून बसलेल्या एसएसबीच्या पथकाने तेथे छापा घातला. यावेळी पूजा आणि मिथूनला अटक करण्यात आली, तर वेश्याव्यवसाय करणाऱ्या त्या तिघींची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले.चार वर्षांपासून सुरू होता धंदाआरोपी मिथून मूळचा चंद्रपूरचा रहिवासी असून, गेल्या काही वर्षांपासून तो भंडारा येथे राहायचा. त्याचे तेथे रेस्टॉरंट असल्याचे समजते. येथे पूजा नागदेवेच्या संपर्कात आल्यानंतर त्याने सेक्स रॅकेट सुरू केले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हे दोघे सेक्स रॅकेट चालवायचे. त्यांच्याकडे शेकडो ग्राहक आणि वेश्याव्यवसाय करणाºया अनेक महिला-मुलींची यादी असल्याचे सांगितले जाते.
नागपुरातील प्रतापनगरात सेक्स रॅकेटचा भंडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 21:37 IST
प्रतापनगरात युनिसेक्स ब्युटी पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या भंडारा येथील एका तरुणासह दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) शुक्रवारी रात्री अटक केली.
नागपुरातील प्रतापनगरात सेक्स रॅकेटचा भंडाफोड
ठळक मुद्देसलूनच्या नावाआड कुंटणखाना : गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा : तीन वारांगना सापडल्या : जोडप्याला अटक