शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Satara Crime news: स्वत: सातवी नापास, तरी सरकारी नोकरी लावत होते! जाळ्यात १८ जण अडकले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 23:19 IST

पटतंय का: होय, उच्चशिक्षित १८ तरूणांना अडकवलंय जाळ्यात

- दत्ता यादव

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : न बोलणाऱ्याचं सोन पण विकलं जात नाही. तर बोलणाऱ्याचा दगडही विकला जातो, अशी एक प्रचलित म्हणं आहे. या म्हणीचाच प्रत्यय सध्या साताऱ्यातील पोलिसांना अनुभवयास येत आहे. दहावी व सातवी नापास असलेल्या दोघा भामट्यांनी केवळ चांगल्या वक्वृत्वाच्या जोरावर पदवीधर व उच्चशिक्षित असलेल्या तरूणांना चक्क सरकारी नोकरी लावतो, अस आमिष दाखविलं, हे दोघे अल्पशिक्षित असूनही त्यांनी ज्या प्रकारे उच्चशिक्षित तरूणांना गंडवलं, ते पाहून साताऱ्यातील पोलीस अक्षरश: चक्रावून गेलेत.

 मारूती जयवंत साळुंखे (वय ४२, रा. नरोटवाडी, ता. इंदापूर, जि, पुणे, मूळ रा, बनपुरी, ता, आटपाडी, जि, सांगली), प्रवीण राजाराम येवले (वय ३४, रा. येवले, वडी, पोस्ट कळंबी, ता. खटाव, जि. सातारा) अशी उच्चशिक्षित तरूणांना गंडा घालणाऱ्या या अल्पशिक्षितांची नावे आहेत. मारूती साळुंखे याचे सातवी तर प्रवीण येवले याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. साताऱ्यातील एमआयडीसीमध्ये हेदोघे नोकरी करत होते. मात्र, सात आणि आठ हजारांत घरखर्च भागवताना दोघांचेही नाकेनऊ येऊ लागले. त्यामुळे काही तरी केलं पाहिजं, अस सारखं त्यांना वाटू लागलं. अशातच त्यांच्या डोक्यात एकभन्नाट कल्पना सूचली. आपण सरकारी नोकरी लावू शकतो, असं सांगून पैसे उकळायचे. अस दोघांच ठरलं. फसवणुकीची सुरूवात त्यांनी स्वत:च्या गावातूनच केली. गावात पदवीधर असलेले बरेच युवक या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागले. या दोघांची साधी राहणीमान, पण विचारसरणी बोलघेवडी. त्यामुळे पटकन उच्चशिक्षित तरूणांचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते कोल्हापूरच्या तहसील कार्यालयापर्यंत आपली चांगली ओळख आणि उठबस असल्याचे त्यांनी तरूणांना सांगितलं. कोणाला शिपार्इ म्हणून तर कोणाला लिपिक तर कोणाला तहसीलदारांचा चालक बनविण्याचं त्यांनी तरूणांपुढं जाळ फेकलं. 

गेल्या तीन वर्षांपासून या दोघांनी उजळमाथाने तरूणांची फसवणूक सुरू केली. कोणाला शंका येऊ नये म्हणून त्यांनी अनेक चाली खेळल्या. दोघे एकत्र कधीच भेटायचे नाहीत. मारूती साळुंखे तरूणांसमक्ष फोन करायचा. तो फोन प्रवीण येवलेला लावायचा. पणभासवायचा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यासंमवेतबोलल्याचा. येवले पलीकडून फोनवर जणू काय अधिकारी असल्याच्या आवेशात बोलायचा. त्यामुळे उच्चशिक्षित तरूणांना विश्वास बसायचा. असे करत या दोघांनी एक दोन नव्हे तर तब्बल १८ उच्चशिक्षित तरूणांना गंडवलं. कोणाकडून २० हजार तर कोणाकडून ३० हजार असे उकळत ही रक्कम १५ लाखांकडे गेली.

हे पहा फसगत झालेल्या तरूणांचे शिक्षण...

फसवणूक झालेल्या युवकांमध्ये कोणी बीए, एमकाॅम, बीएड, बीएससी, आयटीआय, बारावी असे शिक्षण झालेले तरूण आहेत. या तरूणांनीशहानिशा न करता व चिकित्सपणे न पाहाता केवळ बोलण्यावर विश्वास ठेवून वडिलांनी साठवलेली पुंजी या भामट्यांच्या हवाली केली. याचा पश्चाताप आता या तरूणांना झालाय.

पैसे घालवले चैनीवर

हे दोघे सध्या पोलिसांच्या कोठडीत असून, या दोघांनी सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील तरूणांना आपल्या जाळ्यात ओढलंय, तरूणांकडून घेतलेले पैसे त्यांनी चैनीवारी घालवलेत. आता हे पैसे वसूल कसे करायचे, असा प्रश्न पोलिसांना पडलाय. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी