शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल देण्याचा बहाणा; सात वर्षीय मुलीवर शेजाऱ्याकडून लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 23:31 IST

वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नवी मुंबई - सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन देण्याच्या बहाण्याने आईला बाहेर नेल्यानंतर घरी येऊन हे कृत्य केले आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशी सेक्टर 9 येथे राहणाऱ्या सात वर्षीय मुलीसोबत हे कृत्य घडले आहे. सदर मुलगी दुसरीत शिकत असून घरची परिस्थिती बेताची असल्याने तिच्याकडे ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन नव्हता. यामुळे तिच्या आईने शेजारीच राहणाऱ्या कुटुंबाकडे मदत मागितली होती. त्यानुसार 9 जुलैला  शेजारचे दांपत्य त्या महिलेला घेऊन मोबाईलच्या दुकानात गेले होते. त्याठिकाणी लोनवर मोबाईल मिळवून देतो असे त्याने महिलेला सांगितले. यादरम्यान महिलेची मुलगी घरी एकटीच असताना चेक घेण्याच्या बहाण्याने तो परत घरी आला. यादरम्यान त्याने त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. मात्र काही वेळाने पुन्हा सर्वजण घरी आले असता मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती आईला दिली. परंतु भयभीत झालेल्या कुटुंबाने तक्रार देण्याचे टाळले होते. मात्र त्या घटनेनंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने मंगळवारी त्यांनी वाशी पोलीसांकडे तक्रार केली. त्याआधारे वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.