शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्तीने मिठी मारून तरुणीचा केला विनयभंग, पोलिसांनी सीरिअल मोलेस्टरला केली अटक 

By पूनम अपराज | Updated: December 18, 2020 22:34 IST

Molestation : ५० पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग करणारा सीरिअल मोलेस्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

ठळक मुद्दे डी. एन नगर, दिंडोशी, पंतनगर, गोरेगाव, कांदिवली, पार्क साईट, बांगूर नगर चुनाभट्टी आदी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात अपहरण आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. 

पन्नासहून अधिक महिलांचा विनयभंग केलेल्या एका सिरिअल मोलेस्टरला दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या नराधमाने २०११ पासून ते आतापर्यंत अनेक महिलांचा विनयभंग केला आहे. त्याला आतापर्यंत १२ प्रकरणांमध्ये अटकही झाली आहे. तो अनेक पोलीस ठाण्यांमध्ये मोस्ट वॉण्टेड यादीत होता. आरोपीचे नाव कल्पेश देवधरे असं आहे. 

१२ डिसेंबरला दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकी स्वाराने २४ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मिठी मारली होती. त्यानंतर तिच्याशी गैरवर्तन केलं आणि तेथून फरार झाला. यानंतर तरुणीने दिंडोशी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर या आरोपीला पकडण्यासाठी एक विशेष पोलीस पथक नेमण्यात आलं. या पथकाने सर्व सीसीटीव्हीची तपासणी सुरु केली. २०१७ मध्येही पवईत असाच एक गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्या गुन्ह्यातील आरोपीची सर्व माहिती पवई पोलीस स्टेशनमधून घेऊन दिंडोशी पोलीस आरोपी कल्पेश देवधरेच्या घरी पोहोचले आणि त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी  सुनावली.

५० महिलांचा विनयभंग

मुंबईच्या मालाड पूर्वमध्ये दिंडोशी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय सिरीयल मॉलेस्टरच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. वर्ष २०११ मध्ये या आरोपीला एका महिलेसमोर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि नंतर तो जामिनावर सुटला होता. मात्र, झालेल्या शिक्षेपासून त्याने काहीच धडा घेतला नाही. या नराधमाने जवळपास ५० महिलांचा विनयभंग केला. पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये त्यानेच ही कबुली दिली आहे. डी. एन नगर, दिंडोशी, पंतनगर, गोरेगाव, कांदिवली, पार्क साईट, बांगूर नगर चुनाभट्टी आदी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात अपहरण आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :MolestationविनयभंगArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई