शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘इसिस’मध्ये जाण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल आठ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 05:49 IST

कारागृहात सहा वर्षे राहिल्यानंतर, या दोघांनी आपल्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला असून, समाजात परतायचे आहे आणि स्वतःचे पुनर्वसन करायचे आहे, असे म्हणत आपण दोषी असल्याचे डिसेंबर महिन्यात न्यायालयात मान्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  मालवणी येथील एका तरुणाला इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन तरुणांना विशेष एनआयए न्यायालयाने आठ वर्षांची शिक्षा ठोठावली. या दोघांनीही स्वतःच्या गुन्ह्याची न्यायालयात कबुली दिली होती.

विशेष न्या. ए. टी. वानखेडे यांनी बुधवारी या  दोघांचे दोषत्व मान्य केले होते. न्यायालयाने बचाव पक्षाचे वकील ए. आर. बुखारी व एनआयएचे वकील प्रकाश शेट्टी यांनी आरोपी रिझवान अहमद व मोहसिन सय्यद यांच्या शिक्षेसंदर्भात युक्तिवाद केला. शेट्टी यांनी दोन्ही आरोपींना आठ वर्षांची शिक्षा ठोठावण्याची न्यायालयाला विनंती केली.  आरोपी रिझवान अहमद (२५) व मोहसिन सय्यद (३२) यांच्यावर २०१८ मध्ये आरोप निश्चित करण्यात आले.

कारागृहात सहा वर्षे राहिल्यानंतर, या दोघांनी आपल्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला असून, समाजात परतायचे आहे आणि स्वतःचे पुनर्वसन करायचे आहे, असे म्हणत आपण दोषी असल्याचे डिसेंबर महिन्यात न्यायालयात मान्य केले. हे दोघेही बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या प्रचारात गुंतले होते. ते कधीही हिंसाचारात किंवा हत्यांमध्ये सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्यांना सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे. गुन्हा घडला, तेव्हा ते अपरिपक्व होते आणि ऑनलाइन इसिसच्या प्रचारामुळे प्रभावित झाले. त्याबद्दल त्यांनी न्यायालयाची माफी मागितली आहे, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. 

गेल्या वेळी न्यायालयाने आरोपींना त्यांचे म्हणणे  लेखी स्वरूपात देण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणी आतापर्यंत सरकारी वकिलांनी ३९ साक्षीदारांची साक्ष नोंदविली आहे.

टॅग्स :ISISइसिस