शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! विमानतळावर संशयास्पद बॅग आढळली; स्फोटके असल्याचा पोलिसांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 18:15 IST

सुरक्षेत वाढ

ठळक मुद्देपोलीस अधिकाऱ्यांकडून विमानतळाची पाहणी करण्यात आल्याने प्रवाशांना रोखण्यात आले होते त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.काही मार्ग बंद करण्यात आल्याचे सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले.  

नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-३ वर शुक्रवारी पहाटे संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ उडाली. संशयास्पद बॅग सुरक्षित ठिकाणी नेण्यात आली असून विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांकडून विमानतळाची पाहणी करण्यात आल्याने प्रवाशांना रोखण्यात आले होते त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी टर्मिनल ३ वर गेट क्रमांक दोनजवळ पहाटे एक वाजता काळ्या रंगाची संशयास्पद बॅग आढळली. या बॅगेत आरडीएक्स असल्याचा सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आहे. पोलीस उपायुक्त संजय भाटीया म्हणाले की, सीआयएसएफच्या मदतीने बॅग सुरक्षित ठिकाणी नेण्यात आली आहे. आतापर्यंत ही बॅग उघडण्यात आलेली नाही. विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

प्राथमिक चाचणीत बॅगेत स्फोटके असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्याचा आकार स्पष्ट होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीआयएसएफचे विशेष महाअधिक्षक एम.ए. गणपती म्हणाले की, प्रत्यक्ष बॅग उघडल्यावरच खरी माहिती मिळेल. बॅगेत आरडीएक्स असल्याचे दावा करणे घाईचे ठरेल. दहशतवाद्यांकडून हल्ल्यांसाठी सर्रास आरडीएक्सचा वापर केला जातो. संशयास्पद बॅग आढळल्यामुळे प्रवाशांना बाहेर जाण्यापासून रोखण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, विमानतळाकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवर सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली असून काही मार्ग बंद करण्यात आल्याचे सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले.  बॅग २४ तास निरीक्षण कक्षातपुढील २४ तास संशयास्पद बॅग निरीक्षण कक्षात ठेवली जाणार असल्याचे विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. अहवाल मिळाल्यानंतर याबाबत पुढील माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सीआयएसएफ आणि दिल्लीपोलिसांनी संपूर्ण विमानतळाची पाहणी केली आहे. यावेळी सर्व मार्ग बंद करण्यात आले होते.

टॅग्स :Airportविमानतळdelhiदिल्लीPoliceपोलिसNew Delhiनवी दिल्ली