शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! आईची हत्या करून प्राध्यापकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 19:22 IST

प्रा.अ‍ॅलेने स्टॅनली यांनी आईची हत्या करून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.

ठळक मुद्देदिल्ली विद्यापीठातील सेंट  स्टिफन्स महाविद्यालयातील प्रा. अ‍ॅलेन स्टॅनली (२७ ) यांचा मृतदेह सराय रोहिल्ला येथील रेल्वे रुळावर आढळून आला. गेल्य पाच वर्षापासून स्टॅनली दिल्ली राहत होता, तर सात महिन्यांपूर्व लिली स्टॅनली दिल्लीत आल्या होत्या.

नवी दिल्ली - सेंट स्टिफन्स कॉलेजमधील एका प्राध्यापकाने आईची हत्या केली व त्यानंतर रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.दिल्ली विद्यापीठातील सेंट  स्टिफन्स महाविद्यालयातील प्रा. अ‍ॅलेन स्टॅनली (२७ ) यांचा मृतदेह सराय रोहिल्ला येथील रेल्वे रुळावर आढळून आला. प्रा. स्टॅनली तत्वज्ञानाचे अतिथी प्राध्याक होते. मूळचे केरळचे असलेले स्टॅनली पितमपुरा येथील आशियाना सोसायटीमध्ये वास्तव्याला होते. पोलिसांनी त्यांच्या घराची तपासणी केल्यानंतर तेथे त्यांची आई लिली(५५) मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता. त्यांचा मृतदेह पंख्याला लटकत होता. प्रा.अ‍ॅलेने स्टॅनली यांनी आईची हत्या करून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.

प्रा. स्टॅनली गेल्या पाच वर्षांपासून या महाविद्यालयात काम करीत होते. तसेच पीएच. डी. सुद्धा करीत होते. मल्याळम भाषेत लिहिलेली चिठ्ठी सदनिकेत आढळून आली आहे. राणीबाग पोलिसांनी कलम ३०२ अंतर्गत  गुन्हा  दाखल केला आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा या दोघांवर केरळमध्ये यापूर्वीच दाखल झालेला आहे. या संदर्भात त्यांनी मित्रांशी चर्चा केली होती. यावेळी असे टोकाचे पाऊल उचलू नये, असा सल्ला मित्रांनी स्टॅनली याला दिला होता. या खटल्यात ते दोघेही जामीनावर बाहेर असल्याची माहिती मित्रांना दिली होती.

गेल्य पाच वर्षापासून स्टॅनली दिल्ली राहत होता, तर सात महिन्यांपूर्व लिली स्टॅनली दिल्लीत आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या करावी, असे सुचविले होते. परंतु, लिली स्टॅनली यांनी मुलाचे म्हणणे ऐकले नाही. यामुळे अ‍ॅलेन स्टॅनली यांनी आईचा खून करून आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. ही घटना ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. नुकतेच त्याच्याबरोबर दिल्ली शिक्षक संघटनेविषयी  बोलणे झाले होते. ते असे कृत्य करतील असे वाटले नव्हते, असे सेंट स्टिफन्स महाविद्यालयातील अ‍ॅलेनच्या सहकारी नंदिता नारायणने सांगितले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याNew Delhiनवी दिल्लीPoliceपोलिसuniversityविद्यापीठMurderखून