शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! झोपलेल्या मुलीचे अपहरण करून केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 15:33 IST

रविवारी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देया धक्कादायक सामूहिक बलात्काराच्या घटनेत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. पोलिसांच्या हाती आरोपी अद्याप लागले नसून लवकरच आरोपींच्या मुसक्या पोलीस आवळतील असा दावा तपास अधिकारी निर्मल सिंह यांनी केला आहे.

नवी दिल्ली - सध्या, निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींनी फाशी टाळण्यासाठी कायदेशीर गोष्टींचा फायदा घेत कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबाजवणीस विलंब होत असताना हरियाणामध्ये अशाच एका सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हरियाणाच्या यमुना नगरमध्ये पाच जणांनी घरात झोपलेल्या मुलीला उचलले आणि अंगणवाडीत नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक सामूहिक बलात्काराच्या घटनेत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. रविवारी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला.

अत्याचाराच्या मालिका सुरूच ; अल्पवयीन युवतीचे अपहरण करून अत्याचार, गणेशनगर येथील घटना

धक्कादायक! महिला पोलिसाची हत्या करून वर्गमित्राची आत्महत्या 

बोर्डिंग स्कूल सामूहिक बलात्कार; गर्भपात करणाऱ्या मुख्याध्यापकासह विद्यार्थी दोषी  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणा यमुना नगरमध्ये पाच मुलांनी मुलीला घरातुन पळवून मुलीला मारहाण आणि सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी तिला मारहाण करण्यात आली. यामुळे पीडित मुलीला खूप दुखापत झाली आहे. आरोपींनी पीडितेला तिच्या घराबाहेर नेले आणि जवळच बंद अंगणवाडीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.या घटनेत एक अल्पवयीनही सामील होता. पीडित मुलगी कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटली आणि तिने घर गाठले. घडलेली घटना तिने कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांनी तातडीने मुलीला घेऊन पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी कारवाई करत पीडित मुलीला वैद्यकीय मदत पुरविली आणि आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.सामूहिक बलात्कार, प्राणघातक हल्ल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखलघटनेची गंभीरता पाहून पोलिसांनी मुलीला वैद्यकीय उपचार तातडीने पुरविले. त्यानंतर, सामूहिक बलात्कार आणि प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांनी मुली आणि कुटूंबाच्या निवेदनांच्या आधारे अपहरण, सामूहिक बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. मात्र, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आणखी एक कलम समाविष्ट करावा लागू शकतो.या प्रकरणातील सर्व आरोपींची ओळखही मुलीने पटवली आहे. त्याआधारे पोलीस आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांच्या हाती आरोपी अद्याप लागले नसून लवकरच आरोपींच्या मुसक्या पोलीस आवळतील असा दावा तपास अधिकारी निर्मल सिंह यांनी केला आहे.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारHaryanaहरयाणाPoliceपोलिसKidnappingअपहरण