शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

ज्येष्ठांचे एटीएमकार्डं लंपास करून लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:08 IST

५५ एटीएमकार्ड हस्तगत । कासारवडवली पोलिसांची कामगिरी

ठाणे : बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिकांचे एटीएमकार्ड हालचलाखीने अदलाबदल करून त्यांना लुबाडणाºया मुंब्य्रातील सराईत गियासुद्दीन अबू सिद्दीकी (२६) आणि शैझान अब्दुल रेहमान आगा (२४) या दोघांना ठाणे शहर पोलीस दलाच्या कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून पोलिसांनी गुुन्ह्यातील एक लाख चार हजार ७०० रुपयांच्या मुद्देमालासह विविध कंपन्यांचे ५५ एटीएमकार्ड हस्तगत केल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली. या दुकलीने ठाणे, नवी मुंबई, पुणे, सोलापूरसह जयपूर आणि कर्नाटकातही असे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

घोडबंदर रोड येथील आनंदनगर येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक सदानंद वैद्य (६४) हे १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास बँके च्या एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेले होते. त्यावेळी त्यांनी पैसे काढल्यानंतर तेथे एक जण आला. त्याने वैद्य यांना बोलण्यात गुंतवून विश्वास संपादन केला. त्यानंतर हातचलाखीने एटीएमकार्डची अदलाबदल करून त्याद्वारे १९ हजार रुपये काढले. ही बाब वैद्य यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर, अशा प्रकारचे गुन्हे करणाºया आरोपींची जेल तसेच इतर पोलीस ठाण्यांतून माहिती घेणे सुरू झाले. दरम्यान, कासारवडवली पोलिसांनी बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा येथून या दुकलीला अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चार मोबाइल आणि दोन हजार २०० रुपये असा एक लाख चार हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यानंतर, विविध बँकांचे ५५ हून अधिक एटीएमकार्डं जप्त केली असून त्याबाबत संबंधिक बँकांना पत्रव्यवहार केला आहे.दोघांवर वीसहून अधिक गुन्हे दाखलअटकेतील दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी कुर्ला, कल्याण, ठाणे, भिवंडी येथे आठहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांनी कळवा, मुंब्रा, कासारवडवली, नवी मुंबई, पुणे, मुंबई, जयपूर, सोलापूर, कर्नाटक व इतर ठिकाणी एटीएमकार्ड हातचलाखीने अदलाबदल करून फसवणूक केल्याबाबत वीसहून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.