ज्येष्ठांचे एटीएमकार्डं लंपास करून लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 05:08 AM2020-02-09T05:08:17+5:302020-02-09T05:08:29+5:30

५५ एटीएमकार्ड हस्तगत । कासारवडवली पोलिसांची कामगिरी

Senior ATMcard arrested for looting | ज्येष्ठांचे एटीएमकार्डं लंपास करून लुटणाऱ्या दोघांना अटक

ज्येष्ठांचे एटीएमकार्डं लंपास करून लुटणाऱ्या दोघांना अटक

Next

ठाणे : बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिकांचे एटीएमकार्ड हालचलाखीने अदलाबदल करून त्यांना लुबाडणाºया मुंब्य्रातील सराईत गियासुद्दीन अबू सिद्दीकी (२६) आणि शैझान अब्दुल रेहमान आगा (२४) या दोघांना ठाणे शहर पोलीस दलाच्या कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून पोलिसांनी गुुन्ह्यातील एक लाख चार हजार ७०० रुपयांच्या मुद्देमालासह विविध कंपन्यांचे ५५ एटीएमकार्ड हस्तगत केल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली. या दुकलीने ठाणे, नवी मुंबई, पुणे, सोलापूरसह जयपूर आणि कर्नाटकातही असे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.


घोडबंदर रोड येथील आनंदनगर येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक सदानंद वैद्य (६४) हे १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास बँके च्या एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेले होते. त्यावेळी त्यांनी पैसे काढल्यानंतर तेथे एक जण आला. त्याने वैद्य यांना बोलण्यात गुंतवून विश्वास संपादन केला. त्यानंतर हातचलाखीने एटीएमकार्डची अदलाबदल करून त्याद्वारे १९ हजार रुपये काढले. ही बाब वैद्य यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर, अशा प्रकारचे गुन्हे करणाºया आरोपींची जेल तसेच इतर पोलीस ठाण्यांतून माहिती घेणे सुरू झाले. दरम्यान, कासारवडवली पोलिसांनी बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा येथून या दुकलीला अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चार मोबाइल आणि दोन हजार २०० रुपये असा एक लाख चार हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यानंतर, विविध बँकांचे ५५ हून अधिक एटीएमकार्डं जप्त केली असून त्याबाबत संबंधिक बँकांना पत्रव्यवहार केला आहे.

दोघांवर वीसहून अधिक गुन्हे दाखल
अटकेतील दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी कुर्ला, कल्याण, ठाणे, भिवंडी येथे आठहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांनी कळवा, मुंब्रा, कासारवडवली, नवी मुंबई, पुणे, मुंबई, जयपूर, सोलापूर, कर्नाटक व इतर ठिकाणी एटीएमकार्ड हातचलाखीने अदलाबदल करून फसवणूक केल्याबाबत वीसहून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

Web Title: Senior ATMcard arrested for looting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.