शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

सीमा हैदर..४ मुलांची आई की ISI चं प्यादं?; IB नं ATS ला दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 08:19 IST

नोएडाच्या सेक्टर ५८च्या एटीएस ऑफिसमध्ये सीमा आणि सचिन यांची चौकशी सुरू आहे.

नोएडा – पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर(Seema Haider)वर यूपी एटीएसचा संशय बळावत चालला आहे. एटीएस सातत्याने सीमा हैदरकडून अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सचिन आणि सीमा यांची चौकशी सुरू आहे. पाकिस्तानच्या सिंध परिसरात सीमा राहते. तिथून ती कराचीहून युएईच्या शारजाहला गेली. तिथून नेपाळमार्गे भारतात अवैधरित्या प्रवेश केला.

नोएडाच्या सेक्टर ५८च्या एटीएस ऑफिसमध्ये सीमा आणि सचिन यांची चौकशी सुरू आहे. सीमा हैदरची एटीएसनं ८ तास चौकशी केली. सीमा हैदर तपास यंत्रणांची दिशाभूल करत असल्याचा संशय ATS अधिकाऱ्यांना आहे. ज्यारितीने सीमा प्रत्येक प्रश्नाला अचूक उत्तरे देतेय त्याने एटीएसची शंका आणखी बळावत चालली आहे. सीमा हैदरला कुणी गाईड करतंय का असा संशय अधिकाऱ्यांना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यूपी एटीएसला IB कडून काही इनपुट्स मिळाले आहेत. त्यामुळे सीमासोबतच सचिन आणि त्याच्या वडिलांचीही चौकशी होत आहे. सीमाला ISI ने तर पाठवले नाही ना..१५ दिवस लपून राहिल्यानंतर जेव्हा हा प्रकार समोर आला तेव्हा सीमेपलीकडून त्याला लव्हस्टोरीचा बनावट स्टोरी बनवून दिशाभूल करण्याचा तर डाव नाही ना असंही तपास अधिकाऱ्यांना वाटते.

सीमा हैदरचे संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी यूपी एटीएस या १५ प्रश्नांची उत्तरे शोधतंय.

  1. सीमा-सचिन पहिल्यांदा कधी आणि कसे भेटले?
  2. खरेच दोघे PUBG गेमवरच पहिल्यांदा भेटले होते का?
  3. सचिनला भेटण्यापूर्वी सीमाच्या आयुष्याचे सत्य काय होते?
  4. सीमाची सोशल मीडियावरील खाती कुठे आहेत, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये काय आहे?
  5. सचिनला पहिल्यांदा भेटून भारतात येईपर्यंत सीमाने कोणते मोबाईल नंबर वापरले होते?
  6. सीमाने पाकिस्तानातील घर विकल्याचा पुरावा काय?
  7. सीमा आणि तिचा पहिला पती गुलाम हैदर यांचे नाते आणि चार मुलांचे सत्य काय आहे?
  8. पाकिस्तानमध्ये असताना सीमा कोणत्याही पाक एजन्सीच्या संपर्कात होती का?
  9. सीमाने तिच्या मोबाईलमधून काही डेटा डिलीट केला का?
  10. सीमा हैदरच्या बालपणापासून ते भारतात येईपर्यंतचे संपूर्ण सत्य काय आहे?
  11. कराची ते शारजाह आणि शारजाह ते काठमांडू या प्रवासात सीमाला कुणी मदत केली?
  12. काठमांडूमध्ये सचिनसोबत सीमा कोणत्या हॉटेलमध्ये राहिली, कोणत्या मंदिरात आणि तिचे लग्न कधी झाले?
  13. सचिनच्या आधीही सीमाचे PUBG किंवा इतर गेमिंग अॅप्सवर कोणी मित्र होते का?
  14. सचिनला भेटल्यावर सीमाने हिंदी सुधारली की आधीच?
  15. सचिन व्यतिरिक्त सीमाचे भारतात आणखी कोणी मित्र आहेत का?
टॅग्स :Pakistanपाकिस्तानAnti Terrorist SquadएटीएसIndiaभारत