शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून सुरक्षा रक्षक महिलेवर फेकलं ‘अ‍ॅसिड’

By चैतन्य जोशी | Updated: October 13, 2022 22:40 IST

वर्ध्यातील खळबळजनक घटना, मद्यपी आरोपीस ठोकल्या बेड्या

वर्धा: एकतर्फी प्रेमातून सुरक्षा रक्षकाने तिकिट काऊंटरवर बसणाऱ्या महिलेच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड सदृश दाहक पदार्थ फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना १३ ऑक्टोबर रोजी शहरातील मुख्य समजल्या जाणाऱ्या महावीर बालोद्यानात रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. हल्ल्यात महिलेची पाठ आणि हात काही प्रमाणात भाजल्याने तिच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी विकृत आरोपीस बेड्या ठोकल्या. अर्जून चाफले (५२) रा. असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अजूर्न चाफले हा शहरातील महारवीर बालोद्यानात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीवर होता. याच उद्यानात पीडिताही नोकरीवर होती. एकतर्फी प्रेमातून मद्यधूंद असलेल्या अर्जून चाफले याने उद्यानातच पीडितेच्या चेहऱ्यावर अॅसीड सदृश दाहक पदार्थ फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने लगेच ओढणी समोर केल्याने सुदैवाने तिला मोठी इजा पोहचली नाही. पीडितेच्या हातावर आणि पाठीवर दाहक पदार्थ फेकल्या गेल्याने काही प्रमाणात तो भाग भाजला.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी केली. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अर्जून चाफले यास अटक केली असून पीडितेवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती दिली.

‘एसपीं’नी दिली भेट

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. एकतर्फी प्रेमातून आरोपीने प्रसाधनगृह स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅसिड सदृश दाहक पदार्थ आरोपीने महिलेवर फेकल्याचे सांगितले. तसेच सध्या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असून तिच्यावर योग्यरित्या उपचार सुरु असल्याची माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस