शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटानंतर महिलेने केले दुसरं लग्न; रागाच्या भरात पहिला पती घरात घुसला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 14:37 IST

चाकूने लागल्यानंतर महिला ओरडत घराबाहेर पडली. १०० मीटर धावली आणि बेशुद्ध पडली. ती पुर्णपणे रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

भीलवाडा – राजस्थानच्या भीलवाडा येथे एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नामुळे इतका संतापला की त्याने मुलीसमोर चाकू भोसकून तिची हत्या केली. भीमगंजच्या टिळकनगर भागात तो राहतो. २४ वर्षीय ज्योती व्यासला आरोपी नीरज भारतीयने जीवे मारले आहे. ज्योतीनं नीरजसोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिने दुसरं लग्न केले. ही गोष्ट पहिल्या पतीला आवडली नाही म्हणून त्याने रागाच्या भरात तिचा जीव घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने महिलेचा खून केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहचली. जखमी महिलेला रुग्णालयात नेले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हत्या करून आरोपी पती तिथून फरार झाला. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. ज्योती व्यास टिळकनगर भागात एकटी राहत होती. आरोपीने घरात घुसून चाकूने हत्या केल्याचं प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. परंतु घरात काय झालं याबाबत कुणालाही माहिती नाही.

चाकूने लागल्यानंतर महिला ओरडत घराबाहेर पडली. १०० मीटर धावली आणि बेशुद्ध पडली. ती पुर्णपणे रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ती जखमी अवस्थेत असताना तिचा पती शेजारी बसला. परंतु कुणालाही जवळ जाण्याची हिंमत झाली नाही. त्यावेळी कुणीतरी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. जेव्हा पोलीस पोहचले तेव्हा आरोपी पतीने घटनास्थळावरून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतीचा मुलगा आणि मुलगीही घरी होते. मुलगी तिच्या आईसोबत राहते. तर मुलगा वडिलांसोबत राहतो. ज्योती शिवणकाम करत घर सांभाळत होती. तर आरोपी नीरज आसिंदला राहणारा होता. पोलिसांनी ९ वर्षीय मुलगी हर्षिताला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा तिने सांगितले की, पप्पा घरी आले आणि आईशी भांडू लागले. त्यानंतर त्यांनी बॅगेतून चाकू काढला आणि आईला मारू लागले. घाबरलेल्या अवस्थेत आई घराबाहेर गेली. तर ज्योतीने अलीकडेच नीरजशी घटस्फोट घेत दुसरं लग्न केले होते. २० मे रोजी रिसेप्शन होतं. त्याआधीच तिची हत्या केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी