शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

पोलीस यंत्रणा धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपींच्या शोधात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 6:56 PM

 मेगा अ‍ॅग्रो कंपनीतील मॅनेजरचा जामीन बिलोली जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता पोलीस मुख्य आरोपींच्या शोधात लागले आहेत.

बिलोली (नांदेड ) :  मेगा अ‍ॅग्रो कंपनीतील मॅनेजरचा जामीन बिलोली जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता पोलीस मुख्य आरोपींच्या शोधात लागले आहेत. मागच्या १५ दिवसांत मराठा आंदोलनाच्या बंदोबस्तामुळे व्यस्त पोलीस विभागाने आता तपास वाढवल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली़

गेल्या महिन्यातील १८ तारखेला एफसीआय गोदामातून निघालेले शासकीय धान्य शासकीय संबंधित गोदामाकडे न जाता मेगा अ‍ॅग्रो कंपनीत वळले़ बऱ्याच दिवसांपासून पाळतीवर असलेल्या पोलिसांनी दहा तांदूळ व गव्हाचे ट्रक पकडले़ घटना होताच शासकीय वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार व त्यांचा पार्टनर दमकोंडवार आणि मेगा अ‍ॅग्रोचे मालक अजय बाहेती फरार झाले़ दहा ट्रकचालकांना नायगावच्या कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला़  सध्या सर्व ट्रक पोलिसांच्या ताब्यात आहेत़

बिलोली, कुंडलवाडी, तसेच देगलूर व मुक्रमाबाद या शासकीय गोदामात एन्ट्री करून रास्त भाव दुकानदाराकडे द्वारपोच धान्य पोहोचवणे अपेक्षित होते़ मात्र पुरवठा विभागाला हाताशी धरून शासकीय वाहतूक कंत्राटदाराने परस्पर धान्याची विल्हेवाट लावल्याची माहिती पोलिसांनी से-रिपोर्टमध्ये बिलोलीच्या सत्र न्यायालयात दाखल केली़ 

मॅनेजरने अ‍ॅग्रो कंपनीचा आपला संबंध नाही, आपण येथे कर्मचारीच नाही असा पवित्रा न्यायालयात घेतला, पण तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तापडिया मॅनेजर असल्याचे भक्कम पुरावे सादर केल्याने न्या़ एस़बी़ कचरे यांनी त्याचा जामीन फेटाळला़ धान्य घोटाळ्यातील तपास व चौकशी वाढवण्यात आली असून शासकीय ठेकेदार पारसेवार व मेगा कंपनीचे संचालक अजय बाहेती यांना ताब्यात घेतल्यानंतरच संपूर्ण प्रकरण पुढे येणार आहे़ यात पुरवठा विभागातील काहीजण अडकण्याचीही शक्यता आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजीNanded policeनांदेड पोलीसArrestअटक