शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

मुंब्य्रातील अपहृत बाळाचा शोध सुरूच, फुटेजची पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 03:34 IST

मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरुन सलमान अब्दुल खान या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या घटनेला ४८ तास उलटूनही त्याचा शोध लागलेला नाही.

ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरुन सलमान अब्दुल खान या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या घटनेला ४८ तास उलटूनही त्याचा शोध लागलेला नाही. मुंब्रा पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या चार ते पाच पथकांनी सोमवारी दिवसभरात अनेक सीसीटीव्हींची पडताळणी केली. मात्र, शोध न लागल्याने मुलाच्या पालकांनीही चिंता व्यक्त केली.मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार देतेवेळी मुलाचे वडील अब्दुल खान यांच्या मेहुण्याची मुलगी सोनिया (९) हिने आधी एका रिक्षातून आलेल्या व्यक्तीने मुलाला तिच्या ताब्यातून घेऊन गेल्याची माहिती दिली. त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाच्या चौकशीत मात्र तिने एका बुरखा परिधान केलेल्या महिलेने दहा रुपये देऊन कबाब पाव आणण्यास सांगितले. त्यानंतर ती मुलाला घेऊन गायब झाल्याची माहिती दिली. दोन वेगवेगळी विधाने या मुलीने केल्यामुळे पोलिसांच्या तपासातही अडथळा आला. शिवाय, मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरील आणि मस्जिदसमोरील सीसीटीव्ही बंद आढळले. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही चारही पथकांनी पडताळले. ४० ते ५० जणांची चौकशीही केली. मात्र, या महिलेची माहिती अद्याप मिळाली नाही. ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकरणाला आता ४८ तास उलटूनही काहीच धागादोरा हाती न लागल्यामुळे या मुलाच्या पालकांनी चिंता व्यक्त केली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार मुंब्रा आणि गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्याने दोन्ही पथकांकडून तपास सुरु आहे.या प्रकरणात तक्रार दाखल करताना एका रिक्षा चालकाने सलमानला नेल्याचे सोनियाने सांगितले होते. नंतर तिने एका बुरखा परिधान केलेल्या महिलेने त्याला नेल्याचे सांगितले. वेगवेगळया माहितीमुळे गोंधळ निर्माण झाला होता. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या तीन पथकांची निर्मिती केली आहे. सीसीटीव्ही तसेच इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या मुलाचा शोध घेण्यात येत आहे.- किशोर पासलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी