शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणातील अपहृत मुलींचा अवघ्या २ तासात शोध; महात्मा फुले चौक पोलीसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 20:57 IST

Kidnapping Case : हरियाणातून १५ आणि १८ वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलींचे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याबाबत तेथील सीटी तावडू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

कल्याण: हरीयाणा राज्यातून अपहरण झालेल्या दोघा अल्पवयीन मुलींचा अवघ्या दोन तासांत कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांकडून शोध घेण्यात आला.  ही घटना सोमवारी घडली. सुरक्षितरित्या या दोन्ही मुलींना कायदेशीर कारवाईनंतर हरियाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हरियाणातून १५ आणि १८ वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलींचे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याबाबत तेथील सीटी तावडू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान तेथील तपास पथकाला अपहत दोन्ही मुली कल्याणमध्ये असल्याची माहीती मिळाली परंतू हरियाणातून तपास पथकाला कल्याणात पोहोचण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे या मुलींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घ्यावे, अशी विनंती तेथील सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक जसविर सिंग यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांना मोबाईलवरून सोमवारी केली. अपहत घटनेचे गांभीर्य ओळखून होनमाने यांनी ही माहीती पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील यांना दिली आणि त्यानंतर अपहृत मुलींचा कल्याण परिसरात शोध घेण्याची जबाबदारी  गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या पथकावर सोपविली. पथकाने कल्याण रेल्वे स्थानक, एसटी स्टॅन्ड, मार्केट परिसरात अपहृत मुलींना हुडकून काढण्यासाठी त्यांच्या मिळालेल्या वर्णनांच्या आधारे शोध मोहीम राबवली.

दिलेल्या वर्णनाप्रमाणो दोन्ही अल्पवयीन मुली लक्ष्मी भाजी मार्केटच्या गेटसमोर भांबावलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पथकातील महिला पोलिसांच्या मदतीने या मुलींना ताब्यात घेऊन त्यांची आस्थेवाईकपणो चौकशी केली असता त्या हरीयाणा राज्यातून अपहरण झालेल्या मुलीच असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती कळताच हरीयाणा राज्यातील सिटी तावडू पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक  सिंग यांनी पोलिस पथकासह कल्याण गाठले.  कायदेशिर कारवाईनंतर या दोन्ही मुलींना सिंग यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान अपहृत दोन्ही अल्पवयीन मुलींची माहिती मिळाल्यापासून अवघ्या दोन तासांत शोध घेऊन त्यांना हरियाणा पोलिसांच्या सुखरूप ताब्यात देण्याची उल्लेखिनय कामिगरी बजावणा-या पोलिसांचे पूर्व उपप्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील यांनी कौतुक केले.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसkalyanकल्याणHaryanaहरयाणा