शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा आवाज वापरून हाेतेय फसवणूक, सावध व्हा; केवळ ३ सेकंदांचा आवाज पुरेसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 08:14 IST

फसवणुकीचा हा प्रकार सर्वत्र फोफावत असला तरी भारतात यामुळे पीडित असलेल्यांचे प्रमाण जगभरातील एकूण पीडितांच्या तब्बल दुप्पट आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हा जणू परवलीचा शब्द बनला आहे. अशातच एआय व्हाॅइस स्कॅम हा फसवणुकीचा नवा प्रकार एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. देशातील सुमारे निम्म्या प्रौढांनी एआय व्हॉइस स्कॅमचा फटका खाल्ला आहे किंवा त्यांच्या जवळच्या कुणाचीतरी या मार्गाने फसवणूक झालेली आहे. 

फसवणुकीचा हा प्रकार सर्वत्र फोफावत असला तरी भारतात यामुळे पीडित असलेल्यांचे प्रमाण जगभरातील एकूण पीडितांच्या तब्बल दुप्पट आहे. यामुळे एआयपासून लोकांना अधिक सावधानता बाळगावी लागणार आहे. 

बहुतांश यूझर्स बेसावध६९% लोकांना आजच्या घडीला त्यांचा खरा आवाज आणि एआय आवाज यात काही फरक असतो हेच ठाऊक नाही. ते या दोन्ही आवाजातील फरक ओळखू शकत नाहीत. ६६% लोक एखादा मित्र वा जवळच्या व्यक्तीकडून व्हॉइस मेसेज वा व्हाॅइस नोट आली तरी उत्तर देण्यास तयार झाले. समोरच्या व्यक्तीने संकटाचे कारण सांगितल्याने त्यांना याचा संशय आला नाही. या लोकांनी प्रसंगी पैसे पाठवण्याचीही तयारी दाखविली.

केवळ ३ सेकंदांचा आवाज पुरेसा ऑनलाइन फसवणूक करताना एआयचा वापर कसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे, याबाबत मॅकेफी या संस्थेने सर्वेक्षण केले. हा मुद्दा खूप गंभीर असल्याचे लक्षात आले. कारण एखाद्या व्यक्तीच्या आवाजाप्रमाणे हुबेहूब आवाज तयार करावयाचा असेल ३ सेकंदांचा आवाज पुरेसा होतो. या डुप्लीकेट आवाजाच्या मदतीने संबंधित व्यक्तीला गंडा घातला जाऊ शकतो. 

कोणती कारणे सांगितली?७०% मेसेज लुबाडणुकीचे कारण६९% प्रकरणांत कारला अपघाताचे कारण ६५% पाकीट मारले किंवा हरवले ६२% परदेशी प्रवासात मदतीसाठी

टॅग्स :fraudधोकेबाजी