शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीची तुफान मेल, रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष; शेतकऱ्याला पावणेतेरा लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 08:58 IST

रेल्वेच्या नावाने सुरू केलेल्या या फसवणुकीच्या तुफान मेलमध्ये लातूरमधील एका शेतकऱ्याचा समावेश झाला आहे.

मुंबई : रेल्वेत नोकरी लावून देतो, असे सांगायचे. गरजूंकडून पैसे उकळायचे. काम झाले की आपले दुकान बंद करायचे, असा फसवणुकीचा एक नवीन ट्रेण्ड निर्माण झाला असून, त्यात फसणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रेल्वेच्या नावाने सुरू केलेल्या या फसवणुकीच्या तुफान मेलमध्ये लातूरमधील एका शेतकऱ्याचा समावेश झाला आहे. त्याला तब्बल पावणेतेरा लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. 

ही कहाणी आहे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील राजा गुट्टे यांची. ते शेती करतात. गेल्यावर्षी २० मे रोजी एका नातेवाइकाच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावण्यासंदर्भातील कामासाठी गुट्टे मुंबईत आले होते. वाकोलातील एका हॉटेलात त्यांची ओळख संतोष चोपडे याच्याशी झाली. गुट्टे यांच्या दोन मुलांना रेल्वेत लिपिकाची नोकरी लावून देतो असे आमिष चोपडेने दाखवले. गुट्टेही त्यास भुलले. नोकरी लावून देण्यासाठी मात्र दोन्ही मुलांचे १७ लाख रुपये लागतील, असे चोपडेने सांगितले. त्यानंतर गुट्टे गावी परतले. काही दिवसांनी चोपडेने गुट्टे यांना दूरध्वनी करून रेल्वेतील नोकरीविषयी विचारणा केली. अखेर त्याच्या आमिषाला बळी पडून त्यांनी पैसे पाठविण्यास सुरुवात केली. जवळील जमापुंजीसह नातेवाइकांडून पैसे घेत चोपडेपर्यंत पाठवले.

नियुक्तीपत्र दिले १५ सप्टेंबर रोजी चोपडेने गुट्टे यांना दूरध्वनी करून मुलाचे नियुक्ती पत्र तयार असून, घेऊन जाण्यास सांगितले. मात्र त्यापूर्वी सहा लाख रुपये देण्यास सांगितले.  ठरल्याप्रमाणे २० सप्टेंबर रोजी सांताक्रूझ येथे गुट्टे आणि चोपडे यांची भेट झाली. त्यावेळी गुट्टे यांनी चोपडेला सहा लाख रुपये दिले. चोपडेने यावेळी गुट्टे यांच्या मुलाला मध्य पूर्व रेल्वेचे नियुक्तीपत्र दाखविले. त्यानंतर नोकरीवर कधी रुजू व्हायचे याबाबत चौकशी करताच चोपडेकडून टाळाटाळ सुरू झाली. काही दिवसांनी दुसऱ्या मुलाचेही नियुक्तीपत्र व्हॉट्सॲपवर पाठवले. त्यानंतर चोपडेसह त्याची पत्नीही ‘नॉट रिचेबल’ झाली. अखेर फसवणूक झाल्याची खात्री पटताच गुट्टे यांनी पोलिसांत धाव घेतली. चोपडे आणि त्याच्या पत्नीने दोन्ही मुलांना नोकरीचे आमिष दाखवून १२ लाख ७९ हजार रुपये लाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार, वाकोला पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. या प्रकरणात आणखी शेकडो जणांची फसवणूक झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

रेल्वे ऑफिसात मुलाखतगेल्यावर्षी १४ जून रोजी चोपडेच्या सांगण्यावरून गुट्टे मुलाला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आले. तेथे चोपडेने त्यांना मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर मुलाखतीसाठी नेले. तिथे त्यावेळी आणखी १५ जण मुलाखतीसाठी उपस्थित होते. मुलाखत होताच गुट्टे मुलासह गावी परतले. मुलाखतीनंतर गुट्टेंनी उर्वरित पैसे चोपडेला पाठवण्यास सुरुवात केली.

टॅग्स :fraudधोकेबाजीrailwayरेल्वे