शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सव्वा कोटीची फसवणूक : लाचखोर मंडळ अधिकारी... हाजीर हो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 03:55 IST

१ कोटी २० लाख रु पयांची फसवणूक केल्या प्रकरणी मागील महिन्यात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई : वसई तहसीलदार कार्यालयात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असताना आपण वसईचे तहसीलदार असल्याचे सांगून मुंबईच्या व्यावसायिकांना जमीन देण्याच्या बहाण्याने निलंबित व लाचखोर तलासरी तहसीलचा झरी मंडळ अधिकारी सुनील पोपट राठोड (४२) याने १ कोटी २० लाख रु पयांची फसवणूक केल्या प्रकरणी मागील महिन्यात वसई पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा गुन्हा दाखल होताच आरोपी सुनील राठोड हा फरार झाला असून त्याच्या शोधात वसई पोलीस असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक पुकळे यांनी दिली आहे.मुंबई- दहिसर येथील दोघा व्यावसायिकांना आपण वसईत तहसीलदार असल्याचे सांगून जमीन देतो असे आमिष देऊन राठोड याने त्यांच्याकडून सहा वर्षांपूर्वी तब्बल १ कोटी २० लाख रु पये उकळले होते.२०१३ मध्ये वसईत पुरवठा निरीक्षक पदावर राठोड हा कार्यरत असताना फिर्यादी अभिषेक रामसिंग हांडा व भागीदार इम्रान पटेल या दोघा व्यावसायिकाकडून राठोड याने एकूण सव्वा कोटीची भली मोठी रक्कम उकळली होती. त्यातच दोघांपैकी एक भागीदार इम्रान पटेल यांचा सन २०१५ मध्ये मृत्यू झाल्यावर हांडा या व्यावसायिकाने राठोड याच्याकडे आपले पैसे किंवा जमिन परत मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु केला होता.दरम्यानच्या काळात सुनील राठोड याची तलासरी तालुक्यात झरी मंडळ अधिकारी म्हणून बदली देखील झाली. मात्र, त्या ठिकाणी तक्र ारदराने पाठपुरावा सुरु च ठेवला होता. आपले पैसे किंवा बदल्यात जमिन काही परत मिळत नाही हे लक्षात आल्यावर अखेर या व्यावसायिकाने वसई पोलिस ठाण्यात धाव घेत राठोड याच्या विरु द्ध फसवणुकीची तक्र ार दाखल केली,या प्रकरणी वसई पोलिसांनी आरोपी सुनील पोपट राठोड याच्या विरु द्ध भा.दंड.संहिता कलम ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.एका जबाबदार पदावरील महसूल अधिकाऱ्याने अशा प्रकारचे कृत्य केल्याने पालघर जिल्हा महसूल प्रशासनाचे तीन तेरा वाजवले आहेत.न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला !वसई पोलिसांच्या सांगण्यानुसार, हा फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच राठोड याने आपल्या मुंबईच्या राहत्या व चाळीसगावच्या घरातून देखील पळ काढला आहे. त्याच दरम्यानच्या काळात राठोड याने अटक पूर्व जामिनासाठी वसई कोर्टात अर्ज देखील केला होता.मात्र, वसई पोलिसांनी हा डाव उधळून लावला. याउलट मधल्या काळात बदल्या, आचारसंहिता, बंदोबस्त या सर्व घडामोडीत आरोपी सुनील राठोड आता कुठंही सापडत नव्हता तर त्याचा सर्व ठिकाणी शोध सुरु असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक पुकळे यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयVasai Virarवसई विरार