शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Satish Kaushik यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण; आता दिल्ली पोलीस उचलणार मोठं पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 16:24 IST

...तत्पूर्वी, आपल्या पतीने सतीश कौशिक यांच्याकडून व्यवसायासाठी 15 कोटी रुपये घेतले होते आणि हे पैसे परत करावे लागू नयेत, यासाठी त्यांनी कट रचून चुकीचे औषध दिले, असा आरोप कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू यांच्या पत्नीने केला होता.

बॉलिवूड अभिनेते तथा दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात आता विकास मालू (Vikas Malu) यांच्या पत्नीचा जबाब नोंदवून चौकशी करण्याची दिल्ली पोलिसांची इच्छा आहे. तत्पूर्वी, आपल्या पतीने सतीश कौशिक यांच्याकडून व्यवसायासाठी 15 कोटी रुपये घेतले होते आणि हे पैसे परत करावे लागू नयेत, यासाठी त्यांनी कट रचून चुकीचे औषध दिले, असा आरोप कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू यांच्या पत्नीने केला होता.

पोलीस विकास मालू यांच्या पत्नीला दुसऱ्यांदा नोटिस पाठवणार - दिल्ली पोलीसमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात अद्याप काहीही संशयास्पद आढळलेले नाही. तसेच त्यांच्या कुटुंबानेही कसल्याही प्रकारचा संशय व्यक्त केलेला नाही. यानंतर आता, दिल्ली पोलीस यासंदर्भात विकास मालू यांच्या पत्नीला दुसऱ्यांदा नोटीस पाठवणार आहे. पोलीस विकास मालू यांच्या पत्नीचा जबाब नोंदवण्याबरोबरच चोकशीही करू इच्छिते. दिल्ली पोलिसांनी तक्रारीच्या आधारे विविध प्रश्नांची यादीही तयार केली आहे.

दाऊदसोबत विकासच्या संबंधांची चौकशी करत आहे पोलीस -सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात दिल्ली पोलिसांना अद्याप काहीही संशयास्पद आढळलेले नाही. मात्र असे असतानाही पोलीस प्रत्येक अँगलने तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, नोंदवलेले जबाब आणि तपासानंतर या मृत्यू प्रकरणात काहीही संशयास्पद आढळलेले नाही. तक्रारीत, विकास मालू यांच्या दाऊदशी असलेल्या संबंधांसंदर्भात बोलताना, प्रत्येक मुद्द्याची सखोल चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

यातच, सतीश कौशिक यांच्या पत्नी शशी कौशिक यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. सतीश कौशिक आणि विकास मालू हे चांगले मित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचवेळी त्यांनी विकास मालू यांनी 15 कोटी रुपये घेतल्याचेही फेटाळले. तसेच,  विकास मालू 'खूप श्रीमंत' व्यक्ती असून त्यांना पैसे मागण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.