शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेती तस्करी करणाऱ्या टिप्परने घेतले दोघांचे बळी : बोलेरोला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 23:14 IST

रेतीची तस्करी करणाऱ्या एका टिप्परचालकाने प्रवाशाने भरलेल्या बोलेरो वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे बोलेरोतील दोघे जण ठार झाले तर १० जखमी झाले.

ठळक मुद्दे१० जखमी, एकाची प्रकृती गंभीर : म्हाळगीनगर चौकात अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेतीची तस्करी करणाऱ्या एका टिप्परचालकाने प्रवाशाने भरलेल्या बोलेरो वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे बोलेरोतील दोघे जण ठार झाले तर १० जखमी झाले. राहुल बन्सी बंजारा (वय २५, रा. ग्राम ढाबा गरोट मंदसोर) तसेच भैरूलाल कारूलाल गौड (वय २५, रा. ग्राम परपडा, गरोट मंदसौर)अशी मृतांची नावे आहेत. तर, जखमी झालेल्या १० मजुरांपैकी जगदीश दुर्गा बंजारा याची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी भल्या सकाळी ७ च्या सुमारास वर्दळीच्या म्हाळगीनगर चौकात हा भीषण अपघात घडला.रोजगाराच्या शोधात तीन महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातून नागपुरात आलेली मंडळी खापरी परसोडी परिसरात झोपड्या टाकून राहतात. भल्या सकाळी उठून ते विविध भागात रात्रीपर्यंत छोटी छोटी खेळणी, प्लास्टिकच्या वस्तू विकण्यासाठी निघतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी भल्या सकाळी १२ ते १५ जण बोलेरो पिकअप व्हॅनमध्ये (एमपी १४/ जीबी १३३२) खेळणी विकायला निघाले. त्यातील काही जण ताजबाग तर काही जण कामठीकडे जाणार होते. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाळगीनगर चौक ते दिघोरी नाका मार्गाने बोलेरो जात होती. तुकाराम महाराज चौक माटे वाईन शॉपकडून रेती (माती) ची तस्करी करणाऱ्या टिप्पर (एमएच ३६/ एए १५९५) च्या चालकाने निष्काळजीपणे वेगात ट्रक चालवून बोलेरोला जोरदार धडक मारली. ही धडक एवढी जोरदार होती की बोलेरो फुटबॉलसारखी उडून बाजूला फेकली गेली. बोलेरोत बसलेले राहुल बंजारा आणि भैरूलाल गौड हे दोघे जागीच गतप्राण झाले तर बोलेरोचालक फकीर मोहम्मद बाबुखान, गोपाल चेतन सिंग (वय २५, रा. मनसोर), बबलू बंजारा, विनोद मानगू बंजारा (वय २५, रा. सीतामावू मनसोर), जगदीश बन्सी चावडा (वय २५), अनिल जगदीश गौड (वय २२, रा. बोरखेडा नगदा उज्जैन), तेजराम सब्बा बंजारा (वय ६५, रा. अमरापूर भानपूरा, मनसोर), जगदीश तेजराम बंजारा (वय २१), नरसिंह कनिराम गराशा (वय ३५, रा. पिंपलाखेडा, मंदसौर) तसेच जगदीश दुर्गा बंजारा (वय २४, रा. खरडावडा मंदसोर, म.प्र.) हे जबर जखमी झाले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू