शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांनी केला लाचेच्या आरोपाचा इन्कार; एनसीबी करणार चौकशी, पंच प्रभाकर साईल यांचीही तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 06:48 IST

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्यावर लाचेचा आरोप केल्याने त्याची अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. वानखेडे उद्या दिल्लीत जाणार आहेत.

नवी दिल्ली : आर्यन खानला अटक प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाचेचा आरोप केल्याने त्याची अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. वानखेडे उद्या दिल्लीत जाणार आहेत. एनसीबीच्या उत्तर विभागाचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह चौकशी करतील. आपल्याकडून दहा कोऱ्या कागदांवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सह्या घेतल्याचा दावाही साईल यांनी केला. 

शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये लाच मागण्यात आली. त्यातील ८ कोटी रुपये वानखेडे यांना मिळणार होते, असा आरोप साईल यांनी केला.   संबंधित चित्रफीत व प्रतिज्ञापत्र समोर आल्यानंतर वानखेडे यांनी आरोप फेटाळले. मात्र एनसीबीने ज्ञानेश्वर सिंह यांना चौकशी करण्यास सांगितले. सिंह म्हणाले की,  संबंधित कागदपत्रे मला मिळाली आहेत. त्या आरोपांची चौकशी पारदर्शक असेल. साईल यांचीही एनसीबीचे अधिकारी चौकशी करण्याची शक्यता आहे.

बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरी : मलिकनांदेड : समीर वानखेडे यांचे मूळ नाव हे समीर दाऊद वानखेडे आहे. त्यांनी स्वत:ला एससी असल्याचे दाखवून शासकीय नोकरीसाठी त्याचा लाभ उठविला. आता बोगस केसेस करीत सुटले आहेत,असा गौप्यस्फोट अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी येथे केला.समीर यांच्या वडिलांनी धर्मांतर करून लग्न केले; परंतु हे धर्मांतर लपून ठेवले. सरकारी नोकरीच्या ठिकाणीही त्यांनी कुटुंबाबाबत पुरावा दिला नाही. समीर यांनीही बोगस सर्टिफिकेटच्या आधारावर नोकरी मिळवली. त्यांच्या जागी एखादा मागासवर्गीय अधिकारी झाला असता, असे ते म्हणाले.

मनाई आदेश देण्यास विशेष कोर्टाचा नकारवानखेडे यांच्यावर आरोप करणारे पंच प्रभाकर साईल यांच्या प्रतिज्ञापत्राची दखल घेऊ नये ही विनंती विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळली. हा वानखेडे व एनसीबीला मोठा झटका आहे. 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी