Video : नोकरीसाठी समीर वानखेडेंनी धर्म बदलला, ते मुस्लिमच आहेत; मलिकांनी दाखवला कागद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 17:37 IST
Sameer Wankhede : या फोटोच्या सत्यतेबाबत समीर वानखेडे यांनी २००६ साली माझं पहिलं लग्न झालं होतं आणि त्यानंतर घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं असल्याची माहिती वानखेडे यांनी दिली.
Video : नोकरीसाठी समीर वानखेडेंनी धर्म बदलला, ते मुस्लिमच आहेत; मलिकांनी दाखवला कागद
ठळक मुद्दे या कागदावर आईचं नाव झेहदा वानखेडे आणि वडलांचं नाव दाऊद वानखेडे असं लिहिलेलं आहे. १९७९ सालचा हा दाखला आहे.
एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत. त्यांचं खरं नाव समीर दाऊद वानखेडे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक कथित जन्मदाखल्याचा फोटो ट्विट केला आहे. त्या कथित जन्मदाखल्यामध्ये १४ डिसेंबर १९७९ अशी तारीख दिसत असून समीर आणि मुस्लिम असं इंग्रजीत लिहिलेलं दिसतं आहे.
वानखेडे यांचा तरुण असतानाचा मुस्लिम पद्धतीने केलेल्या विवाहाचा फोटो ट्विट करत त्यावर पैचान कौन? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये एक कागदही नवाब मलिक यांनी ट्विट केला आहे. ट्विट करून ''यहाँ से शुरू होता है फर्जीवाडा'' असं नवाब मलिकांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याचदरम्यान समीर वानखेडे यांचा त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्या बरोबरचाही फोटो व्हायरल झाला आहे.
समीर वानखेडेंचा लग्नातला फोटो व्हायरल झाला. हा फोटो वानखेडेंच्या पहिल्या लग्नातला असल्याचं सांगितल जातं आहे. या फोटोत एकूण पाचजण दिसत आहेत. त्यात वानखेडेही आहेत. सोबत डॉ. शबाना कुरेशीही आहेत. त्या त्यांची पहिली पत्नी असल्याचं सांगितलं जातं. सोबत समीर वानखेडेंचे आई-वडील आणि आणखी एक व्यक्ती दिसत आहे. मुस्लिम पद्धतीनं हा विवाह झाला असावा असं त्यांनी केलेल्या पेहरावाद्वारे दिसून येतं. मात्र, या फोटोच्या सत्यतेबाबत समीर वानखेडे यांनी २००६ साली माझं पहिलं लग्न झालं होतं आणि त्यानंतर घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं असल्याची माहिती वानखेडे यांनी दिली.
वानखेडे यांचा फोटो झूम करत नवाब मलिकांनी ट्वीट केला आहे. या फोटोवर पैचान कोन असं नवाब मलिक विचारत आहेत. त्याआधीही नवाब मलिकांनी एक फोटो ट्विट केला. हा समीर वानखेडेंच्या जन्माचा दाखला असल्याचं समजतंय. फोटो अस्पष्ट असल्यामुळे काही गोष्टी समजू शकल्या नाही. पण या कागदावर आईचं नाव झेहदा वानखेडे आणि वडलांचं नाव दाऊद वानखेडे असं लिहिलेलं आहे. १९७९ सालचा हा दाखला आहे, १४-१२-१९७९ अशी या दाखल्यावर तारीख दिसतेय. या दाखल्याचा फोटोही नवाब मलिकांनी शेअर केलाय. समीर वानखेडे जन्मानं मुस्लिम आहेत, असं हा दाखला सांगतो. हाच दाखला नवाब मलिकांनी ट्विट केलाय आणि यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा असं म्हटलं आहे.
'पहचान कौन' असे म्हणत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर केलाय, आणखी खळबळ उडवून दिलीय. 'यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा' असं म्हणत दुसरं ट्वीट करत समीर दाऊद वानखेडे यांचं जन्माचा दाखला शेअर केला आहे. वानखेडेंचा धर्म, त्यांचं पहिलं लग्न अशा अनेक खासगी बाबी अचानक सार्वजनिक झाल्यात. या प्रकरणात दररोज सनसनाटी पुरावे समोर येत आहेत. तसेच वकील सुधीर सूर्यवंशी यांनी जन्मदाखला ट्विट करत समीर दाऊद वानखेडेच्या जन्म प्रमाणपत्रानुसार जन्माने मुस्लिम आहे, परंतु वानखेडे नागरी सेवा परीक्षेला आरक्षित श्रेणीत बसले आणि आयआरएस झाले. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केला आहे की, समीर वानखेडे यांनी परीक्षा आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी खोटे कागदपत्रं बनवून फसवणूक केली आहे.