शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेकी करून सलमानचा करणार होते गेम; बिष्णोई, गोल्डी गँगच्या चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 09:16 IST

सलमान खान याला जिवे ठार मारण्याची धमकी देणारे लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार गँगचे सदस्य हे पनवेल, कळंबोली परिसरात राहत आहेत.

नवीन पनवेल :  बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार गँगच्या चौघांना पनवेलसह बंगळुरू, छत्रपती संभाजीनगर, गुजरात आदी राज्यांतून पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली. धनंजय तपेसिंग ऊर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया ऊर्फ न्हायी उर्फ संदीप बिष्णोई, वस्पि मोहम्मद ऊर्फ वसीम चिकना, इशान झकरूल हसन ऊर्फ जावेद खान अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी सलमानचे राहते घर, फार्महाउस, शूटींगच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शनिवारी दिली.

सलमान खान याला जिवे ठार मारण्याची धमकी देणारे लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार गँगचे सदस्य हे पनवेल, कळंबोली परिसरात राहत आहेत. ते सलमानच्या वाजे येथील फार्महाउस किंवा मुंबईतील वांद्रे त्याचे राहते घर, शूटिंगच्या ठिकाणी पाळत ठेवून सलमानच्या येण्या-जाण्याच्या मार्गांवर त्यांनी रेकी केली असून, त्याला जिवे मारणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना मिळाली. 

अशी केली कारवाईखबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलिस आयुक्त संजय येनपुरे, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक नेमले. ही पथके बंगळुरू, छत्रपती संभाजीनगर, गुजरात, दिल्ली या ठिकाणी दाखल झाली. संबंधित ठिकाणी सापळा लावून धनंजय तपेसिंग ऊर्फ अजय कश्यप याला पनवेल येथून, गौरव भाटिया ऊर्फ न्हायी उर्फ संदीप बिष्णोई याला गुजरात येथून, वस्पि मोहम्मद ऊर्फ वसीम चिकना याला छत्रपती संभाजीनगर येथून आणि इशान झकरूल हसन ऊर्फ जावेद खान याला बंगळुरू येथून ट्रांझिट रिमांड घेऊन अटक केली.

आणखी आरोपींचा शोध कारवाईदरम्यान आरोपींकडून दोन मोबाइल जप्त केले आहेत. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींना पकडण्यासाठी पनवेल शहर पोलिसांची पथके विविध शहरांमध्ये रवाना झाली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी