शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरीत बसून प्रतिबंधित औषधांची अमेरिकेत विक्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 11:21 IST

अवैध कॉल सेंटरवर कारवाई, गुन्हे शाखेकडून १० जणांना बेड्या

मुंबई : भारतात बंदी असलेल्या औषधांची अमेरिकेतील नागरिकांना विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अंधेरीतील कॉल सेंटर उद्ध्वस्त करत १० जणांना अटक करण्यात आली आहे. 

याप्रकरणी साकीब सय्यद (३८), यश शर्मा (२६) यांच्यासह कॉल सेंटरमध्ये काम करणारे उजेर शेख (२६), जुनैद शेख (२२), गौतम महाडिक (२३), जीवन गौडा (२१), मुनीद शेख (४०), हुसैन शेख (२३), विजय कोरी (३८),  मोहम्मद सुफीयान मुकादम (२०) यांना अटक केली आहे. यातील शर्मा हा व्यवसायाने वकील असून तेथे विधि सल्लागार म्हणून काम करत होता. 

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व येथील द समिट बिझनेस बेमधील (ओमकार) तिसऱ्या मजल्यावरील ग्लोबल सर्व्हिसेस येथे अवैध कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शनिवारी गुन्हे शाखेने या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. 

फार्मा कंपन्यांच्या नावाने फोनकारवाईत  साकीब मुस्ताक सय्यद (३८), यश शर्मा (२६) व एका साथीदाराच्या मदतीने अवैध कॉल सेंटर चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यासाठी आठ मुले कॉल सेंटरवर काम करत होती. ते व्हीओआयपी यंत्रणेद्वारे अमेरिकेतील नागरिकांना विविध औषध कंपन्यांच्या नावाने दूरध्वनी करून व्हायग्रा, सियालिस, लिविट्रो व ट्रेमोडोल यासारख्या प्रतिबंधात्मक औषधांची सलमान मोटरवाला या मुंब्रा येथे राहणाऱ्या व्यक्तीमार्फत विक्री करत असल्याचे समोर आले. आरोपींनी केंद्र व राज्य सरकारचा महसूल बुडवून फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. 

सर्व्हर डाऊन या छाप्यानंतर या प्रकरणातील संशयित इरफान कुरेशी, सलमान मोटरवाला व राशीद अन्सारी यांनी सर्व्हर बंद करून तेथील यंत्रणेतील फाइलही डिलिट करून पुरावे नष्ट केले. याप्रकरणी गुन्हे शाखेने तीन मोबाइल, एक लॅपटॉप, एक सर्व्हर, २४ हार्ड डिस्क, एक राऊटर असा मुद्देमाल जप्त केला आहे. डिलीट फाइल पुन्हा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई