उत्तर प्रदेशातील सहारनपुर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या रामपूर मनिहारान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'मोहल्ला महल'मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शबाना असं मृत महिलेचं नाव आहे. पतीनेच तिला गुंगीचं औषध देऊन उशीने तोंड दाबून तिची हत्या केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शबानाचं लग्न २० वर्षांपूर्वी गागलहेडी पोलीस ठाणे परिसरातील कैलाशपूर येथील रहिवासी असलेल्या सलीमसोबत झालं होतं. लग्नानंतर सलीमचे वागणं अत्यंत आक्रमक होतं आणि तो वारंवार शबानाला मारहाण करायचा. या वादाबाबत अनेकदा पंचायतही झाली, पण सलीमच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. मुलीची सुरक्षितता लक्षात घेऊन तिच्या माहेरच्यांनी रामपूर मनिहारानमध्येच तिला राहण्यासाठी घर बांधून दिलं होतं, तरीही छळ सुरूच होता.
इनाम यांनी सांगितलं की, रात्री साडेबाराच्या सुमारास फोन आला. सलीमने जावयाला फोन करून सांगितलं की, 'मी तुझ्या सासूला मारलं आहे, हे घरच्यांना सांगून टाक'. माहिती मिळताच कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली असता शबाना मृतावस्थेत आढळली आणि आरोपी सलीम तिथून पळून गेला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
या प्रकरणाबाबत बोलताना एसपी सिटी व्योम बिंदल यांनी सांगितलं की, "रामपूर मनिहारान परिसरात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून तपास केला आहे. पतीनेच हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, त्याने फोन करून स्वतः गुन्ह्याची कबुली दिल्याचंही समोर आलं आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a man murdered his wife by suffocation after drugging her. He then confessed to his son-in-law. Police are investigating, the husband is absconding and relatives allege repeated abuse.
Web Summary : उत्तर प्रदेश में एक व्यक्ति ने अपनी पत्नी को नशीला पदार्थ देकर गला घोंटकर मार डाला। फिर उसने अपने दामाद को अपराध कबूल कर लिया। पुलिस जांच कर रही है, पति फरार है और रिश्तेदारों ने बार-बार दुर्व्यवहार का आरोप लगाया है।