शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक! महिलेला सहार पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 02:35 IST

मंत्रालय, तसेच विधानभवनमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या महिलेला मुंबईत अटक करण्यात आली. सहार पोलिसांनी ही कारवाई केली असून, या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - मंत्रालय, तसेच विधानभवनमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या महिलेला मुंबईत अटक करण्यात आली. सहार पोलिसांनी ही कारवाई केली असून, या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शीतल रामदास निर्भवणे उर्फ शीतल मनोहर निकम असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. कर्ज मिळवून देण्याचे आमिष तिने तक्रारदाराला दिले होते. त्यानंतर, त्यांना रजिस्ट्रेशनचे पैसे भरावे लागतील, असे तिने सांगितले. कर्ज मिळेल, या आशेने तक्रारदाराने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तिला अडीच लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर, त्यांना ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली, तसेच तिने कोणतेही कर्ज त्यांना दिले नाही. त्यामुळे तक्रारदाराने त्यांचे पैसे परत मागितले. मात्र, तेदेखील तिने परतवले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी महिलेविरोधात सहार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.मंत्रालयात आणि विधानभवनात माझी ओळख असून, मी त्या ठिकाणी नोकरी मिळवून देते, असे सांगत, तिने आणखी एकाला गंडा घालत त्याच्याकडून पाच लाख रुपये उकळले. मात्र, त्यालाही नोकरीला लावले नाही. त्यानुसार, तिच्या विरोधात आणखी एक तक्रार सहार पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी तिला अटक केली.तिच्यावर एम.आर.ए. मार्ग, दादर, पवई, अंबड, नाशिक, भांडुप आणि कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.तुमचीही फसवणूक झाली आहे का?तिने अशाप्रकारे अनेकांनी फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिच्या आमिषाला बळी पडलेल्या नागरिकांनी सहार पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक