शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Sachin Vaze: ठाकरे सरकार सावध! गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या; आतापर्यंतचे सर्वात मोठे फेरबदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 05:20 IST

अनेक वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी

मुंबई : सचिन वाझे प्रकरणांनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. प्रथमच गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी करण्यात आली आहे. यात एनआयए आणि एटीएसच्या चौकशीत अडकलेले एपीआय रियाजुद्दीन काझी यांची सशस्त्र पोलीस दलात तर प्रकाश ओव्हाळ यांची मलबार हिल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटके असलेल्या कार प्रकरणात वाझे एनआयएच्या कोठडीत आहेत. त्या कारचे मालक मनसुख हिरन यांच्या हत्येच्या कटातही ते मुख्य आरोपी आहेत. वाझे यांना पोलीस खात्यात परत घेण्यापासून ते त्यांच्याकडे गुन्हे शाखेतील महत्त्वाचा गुन्हेगारी गुप्तचर विभाग देऊन मोठ्या गुन्ह्यांचा तपास देण्यापर्यंत घडलेल्या सर्वच बाबी संशयाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. त्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारांबे, अपर पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक सोमवारी पार पडली. गुन्हे शाखेत ८ ते १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक आणि अन्य अंमलदार, तसेच ३ ते ५ वर्षे गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांच्या याद्या तयार करून त्यांच्या बदल्यांबाबत चर्चा झाली. या अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा येण्यात आला.

या बैठकीनंतर मंगळवारी रात्री मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. एकाचवेळी गुन्हे शाखेतील ६५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची पहिलीच वेळ असल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

रियाज काझी सशस्त्र पोलीस दलातसचिन वाझे यांच्यासोबत कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी आणि प्रकाश ओव्हाळ यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे.  काझी यांची सशस्त्र पोलीस दलात तर ओव्हाळ यांची मलबार हिल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

यांची होऊ शकते गुन्हे शाखेत बदलीपोलीस निरीक्षकपदी बढती मिळून मुंबई पोलीस दलात नियुक्ती झालेले अधिकारी आणि नवीन इच्छुकांना गुन्हे शाखेत काम करण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.

टॅग्स :Policeपोलिस