शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze: सचिन वाझेंना CIU प्रभारी नेमण्यासाठी योजनाबद्ध खेळी; पोलीस इतिहासात पहिल्यांदाच घडलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 03:26 IST

वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली; नियुक्तीच्या दिवसापासूनच होता असंतोष, तक्रारीनंतरही कारवाई झाली नव्हती

जगदीश जोशीनागपूर : अँटिलिया प्रकरणात अटक केलेले एपीआय सचिन वाझे यांना सीआययू प्रभारी करण्यात आल्यापासूनच मुंबई गुन्हे शाखेत असंतोष होता. वाझे यांना सीआययू प्रभारी करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला करण्यात आले होते. सीआययूच्या इतिहासात पहिल्यांदाच एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रभारी करण्यात आले होते. त्यामुळे नाराज अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही वाझे यांना कायम ठेवण्यात आले होते.

ख्वाजा युनुस प्रकरणात निलंबित वाझे यांना पोलीस सेवेत परत घेण्यात आल्यानंतर ९ जून २०२० रोजी गुन्हे शाखेच्या सीआययूमध्ये प्रभारी करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, वाझे यांच्या नियुक्तीपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी सीआययूमध्ये होते. वाझे यांचा रस्ता मोकळा करण्यासाठी सुरुवातीला त्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटवण्यात आले. निलंबित अधिकाऱ्याला सेवेत परत घेतल्यानंतर सुरुवातीला कंट्रोल रूम, एसबी अशा ठिकाणी नियुक्ती दिली जाते. सीआययू गुन्हे शाखेचा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. 

या विभागाला गोपनीय कारवाई किंवा अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारीच सोपवली जाते. मुंबई गुन्हे शाखेने या आधारावरच अनेक उपलब्धी मिळवल्या आहेत. अशा परिस्थितीत वाझे यांना सीआययू येथे नियुक्ती दिल्यामुळे गुन्हे शाखेत असंतोष पसरला होता. यासंदर्भात तक्रारी करणाऱ्यांना गप्प करण्यात आले होते. वाझे यांनी सीआययूमध्ये येताच संशास्पदरीत्या काम करायला सुरुवात केली. परिणामी, काही अधिकाऱ्यांनी बेनामी तक्रारी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाझे यांच्यापासून सावधान राहण्यास सांगितले. त्यानंतर वाझे यांची नियुक्ती योग्य असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. वाझे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फटकून वागत होते. तसेच, थेट पोलीस आयुक्तांना संपर्क करीत होते, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

काही अधिकाऱ्यांनी बेनामी तक्रारी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाझे यांच्यापासून सावधान राहण्यास सांगितले. वाझे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फटकून वागत होते.थेट पोलीस आयुक्तांना संपर्क करीत होते. त्यामुळे संपूर्ण गुन्हे शाखेने त्यांच्यापुढे गुडघे टेकले होते, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMumbai policeमुंबई पोलीस