शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze: सचिन वाझेंच्या इशाऱ्यावरून मनसुख हिरेनची हत्या; एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 05:53 IST

Mansukh Hiren Murder: खुनाचा तपास सध्या एटीएसकडेच, गेले काही दिवस या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे हे ठाण्याच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत.

जितेंद्र कालेकरठाणे : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सचिन वाझे हाच असून, त्याच्याच इशाऱ्यावरून हे हत्याकांड घडल्याची माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, या हत्या प्रकरणाचा तपास अद्याप एटीएसकडेच असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

गेले काही दिवस या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे हे ठाण्याच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत. रविवारी (२१ मार्च) या हत्या प्रकरणात नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली. गोर हा क्रिकेट बुकी आहे. शिंदे निलंबित पोलीस कर्मचारी असून, २००७च्या वर्सोवा येथील लखनभय्या बनावट चकमकीमध्ये त्याला जन्मठेप झालेली आहे. याच गुन्ह्यात तो पेरोल रजेवर असताना वाझेसाठी काम करीत असल्याचे समोर आले आहे. मनसुख हत्या प्रकरणात १० ते ११ आरोपींचा समावेश असून, हत्या नेमकी कोणत्या कारणांमुळे आणि कशी केली, याचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, विनायक शिंदे याच्या कळवा नाका येथील गोल्ड सुमित या इमारतीच्या तळमजल्यावरील घरी एटीएसच्या एका पथकाने रविवारी आणि सोमवारीही झडती घेतली. त्याचबरोबर त्याच्या घरात चौकशी करून काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे समजते.

आम्हाला काहीच बोलायचे नाही...शिंदे याच्या घरी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता, आम्हाला या विषयावर काहीच बोलायचे नसल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. विनायकसह त्याच्या भावाचे कुटुंबीय एकाच घरात वास्तव्याला आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी शिंदेला ताब्यात घेतल्यापासून त्याच्या घराचा परिसरही चर्चेत आला आहे.

गेल्या एक आठवडाभरापासून मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएकडे जाणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आहे. मात्र, अद्याप एनआयएकडून खुनाचा तपास करण्याबाबत कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही किंवा त्यांच्याकडून तशी मागणीही झाली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अजूनही एटीएसकडेच असून, लवकरच यामध्ये आणखी काही जणांना अटक केली जाईल, असेही एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझेAnti Terrorist Squadएटीएस