शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुतिन यांच्यावर टीका करणाऱ्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 14:51 IST

Russian Model Gretta Vedler : पैशाच्या वादातून दिमित्री कोरोविनने ग्रेटाची हत्या केल्याचे सांगण्यात आले. तसेच, या हत्येचा आणि ग्रेटाच्या राजकीय विधानाचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले जात आहे.

रशियन मॉडेल ग्रेटा वेडलरचा (Russian Model Gretta Vedler) मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडला आहे. 23 वर्षीय ग्रेटा जवळपास एक वर्षापासून बेपत्ता होती, मात्र तिचे सोशल मीडिया अकाउंट सुरू होते. ग्रेटाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना मनोरुग्ण म्हटले होते, तेव्हा ती पहिल्यांदा चर्चेत आली होती.

फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, मॉडेल ग्रेटा वेडलरची हत्या तिचा एक्स बॉयफ्रेंड दिमित्री कोरोविनने (Dimitry Korovin) केली. कोरोविनने ग्रेटाचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून कारच्या डिक्कीमध्ये टाकला होता. या घटनेनंतर आता कोरोविनने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ग्रेटा वेडलरला 300 मैल दूर रशियाच्या लिपेटस्क येथे नेले होते, जिथे त्याने ग्रेटाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवून कारच्या डिक्कीमध्ये मृतदेह फेकला, असे कोरोविनने म्हटले आहे. 

पैशाच्या वादातून दिमित्री कोरोविनने ग्रेटाची हत्या केल्याचे सांगण्यात आले. तसेच, या हत्येचा आणि ग्रेटाच्या राजकीय विधानाचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले जात आहे. कोरोविनने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, तो तीन रात्री हॉटेलच्या खोलीत ग्रेटाच्या मृतदेहासोबत झोपला होता. ग्रेटाच्या मृत्यूनंतर, कोरोविनने तिचे सोशल मीडिया पेज अपडेट करत होता, जेणेकरुन कोणालाही तिच्या मृत्यूचा किंवा गायब झाल्याचा संशय येऊ नये, असेही तपास अधिकारी म्हणाले. 

दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यात  सुरू असलेल्या युद्धाच्या (Russia Ukraine War)  दरम्यान रशियन मॉडेल (Russian Model) ग्रेटाचा मृतदेह सापडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खरंतर, रशियन मॉडेल ग्रेटाने वर्षभरापूर्वी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर उघडपणे टीका केली होती. त्यानंतर ती बेपत्ता होती. मात्र, आता तिचा मृतदेह सापडला असून मारेकऱ्यानेही आपला गुन्हा मान्य केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया