शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War : क्रूरतेचा कळस! रशियन सैन्याने बनवलं 'टॉर्चर चेंबर'; मृतदेहांचे हात बांधले, थरकाप उडवणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:32 IST

Russia Ukraine War : रशियन सैन्याने बूचा शहरात टॉर्चर चेंबर तयार केले आहेत. जिथे मृतदेहांचे हातपाय बांधून ठेवण्यात आले आहेत. 

युक्रेन आणि रशियामधील वाद आता आणखी चिघळला असून युद्ध पेटलं आहे. युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे. रशियन सैन्याने क्रूरतेचा कळस गाठला आहे. अंगावर काटा आणणाऱ्य़ा अनेक घटना आणि थरकाप उडवणारे अनेक फोटो हे सातत्याने समोर येत आहेत. बूचा शहरात रस्त्यावर मृतदेह पडले आहेत. यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन सैन्याने बूचा शहरात टॉर्चर चेंबर तयार केले आहेत. जिथे मृतदेहांचे हातपाय बांधून ठेवण्यात आले आहेत. 

मारियूपोल, खारकीव्हनंतर आता बूचा शहर उद्ध्वस्त झालं आहे. युक्रेनमधील लोकांना त्रास देण्यासाठी बूचाच्या चिल्ड्रन हेल्थ रिसॉर्टच्या बेसमेंटमध्ये टॉर्चर चेंबर बनवलं आहे. या बेसमेंटमध्ये पाच लोकांचे मृतदेह आढळून आले असून मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मृतदेहांचे काही भयंकर फोटो आता समोर येत आहेत. युक्रेनने दावा केला आहे की रशिया बूचा शहरात नरसंहार करत आहे. आतापर्यंत 300 हून अधिक सामान्य नागरिकांना मारलं आहे. तसेच लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. युक्रेनमधील लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. 

बूचा शहरात सध्या वीज, पाणी आणि गॅसची सध्या कोणतीही व्यवस्था नाही. अनेक लोक घर सोडून पळून गेले आहेत. रशियन सैन्य बूचा शहरात लोकांवर अमानुष अत्याचार करत आहेत. लोकांचे हात-पाय बांधून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जात आहेत. घरामध्ये असलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांचा मोबाईल तपासला जात आहे. रशियन सैनिक महिला आणि मुलींवर अत्याचार करत आहेत. याच दरम्यान युक्रेनमध्ये एका 10 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला असून तिला लोखंडी सळीने चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच महिलांच्या शरीराची अक्षरशः चिरफाड केली जात आहे. 

रशियन सैन्याचा युक्रेनमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; लोखंडी सळीने चटके

युक्रेनच्या खासदाराने गंभीर आरोप केला आहे. रशियन सैनिकांनी 10 वर्षांच्या मुलींवरही बलात्कार केले. महिलांच्या शरीरावर डाग केले असा आरोप युक्रेनच्या खासदार लेसिया वासिलेन्क यांनी ट्विटरवरून केला आहे. या सैनिकांनी महिला आणि मुलींच्या शरीराची अक्षरशः चिरफाड केली असून क्रूर अत्याचार केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महिलांच्या शरीरावर लोखंडी सळया तापवून डाग देण्यात आले आहेत. हे डाग स्वस्तिकसारखे दिसत असल्याचंही लेसिया यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासोबत एक फोटोही शेअर करत "रशियन सैन्य युक्रेनमध्ये लोकांची लूट, बलात्कार आणि हत्या करत होते आणि रशियाला अनैतिक गुन्ह्यांचे राष्ट्र म्हणून संबोधले" असं म्हटलं आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया