शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेतल्याप्रकरणी आरटीओ निरीक्षक व अन्य दोघांना दोन दिवसांची कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 21:22 IST

निरीक्षक प्रभू याच्या जामीन अर्जावर आज निकाल : भ्रष्टाचारात हात नसल्याचा दावा

मडगाव - पोळे चेक नाक्यावर येणा:या ट्रक चालकांकडून हप्ते वसुल करण्याच्या आरोपाखाली अटक केलेले आरटीओ निरीक्षक वामन प्रभू व अन्य दोघांच्या अधिक चौकशीसाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक दावे हाताळणारे खास न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड दिला.

दरम्यान, प्रभू याने जामीनासाठी केलेल्या अर्जावर न्या. देशपांडे यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. या अर्जावरील निकाल आज शुक्रवारपर्यंत राखून ठेवला. संशयिताच्यावतीने अ‍ॅड. पराग राव व अ‍ॅड. अमेय प्रभूदेसाई यांनी बाजू मांडली. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात आपल्या अशिलाचा कुठलाही हात नसल्याचा दावा त्यांनी केला. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी बुधवारी पहाटे पोळे चेक नाक्यावर छापा टाकून प्रभू याच्यासह बसवराज गुरजनवार व जितेंद्र वेळीप याना अटक केली होती. त्यांच्याकडून 16,500 रुपयांची रोख जप्त केली होती. प्रभू याच्या सांगण्यावरुन इतर दोन एजंट ट्रकवाल्यांकडून पैसे घेत होते असा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, संशयिताच्यावतीने जामीनासाठी अर्ज करताना या छापा टाकला गेला. तेव्हा निरीक्षक प्रभू आपल्या कार्यालयात झोपला होता. झोपलेल्या अवस्थेत असताना त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे कुठलीही रक्कम सापडली नाही. या कथित भ्रष्टाचारात त्याचा हात असल्याचा कुठलाही पुरावा पोलिसांकडे नसल्याने त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी वकिलांनी केली.

सरकारी वकील लादिस्लाव फर्नाडिस यांनी या जामिनाला विरोध करताना ज्यावेळी हा छापा मारला गेला त्यावेळी जितेंद्र वेळीप व बसवराज गुरजनवार या दोन आरटीओशी संबंध नसलेल्या दोन व्यक्ती त्या कार्यालयात उपस्थित होत्या. तेच ड्रायव्हरकडून पैसे घेत होते. त्यावेळी प्रभू दुसऱ्या खोलीत झोपलेला होता. जर आरटीओ अधिकाऱ्याचा या भ्रष्टाचाराशी संबंध नव्हता तर या दोन अनधिकृत व्यक्ती त्यावेळी चेक नाक्यावर काय करत होत्या असा सवाल करुन हा सर्व प्रकार आरटीओ अधिकाऱ्याच्या संगनमताने होत होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी संशयितांना पोलीस कोठडीत ठेवून अधिक चौकशी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा