शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल अरेस्टची धमकी देत मुंबईतील डॉक्टरकडून उकळले दोन कोटी ८९ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:09 IST

२-४ जूनदरम्यान फसवणुकीची घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विलेपार्ले येथील एका ७३ वर्षीय डॉक्टरकडून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीने तब्बल २.८९ कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. नरेश गोयल प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्या डॉक्टरला डिजिटल अरेस्टची धमकी दिली होती. मात्र, मुंबई सायबर पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे १.२९ कोटी रुपये गोठवण्यात आले.

विलेपार्लेतील डॉक्टरला एका व्यक्तीचा व्हिडीओ कॉल आला होता. त्या व्यक्तीने स्वतःची ओळख ‘ट्राय’ चा अधिकारी म्हणून करून दिली. त्याच व्हिडीओ कॉलदरम्यान, फसवणूक करणाऱ्याने डॉक्टरला पोलिस अधिकारी, न्यायाधीश म्हणून ओळख करून देणाऱ्या लोकांशी बोलण्याची व्यवस्था केली. डॉक्टरचे बँक खाते एका एअरलाइन कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित असलेल्या मनी लाँड्रिंगच्या संशयास्पद व्यवहारासाठी वापरले जात आहे, अशी सबब सांगून त्यांनी डॉक्टरला अनेक बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

अटक करण्याची धमकी

घाबरलेल्या डॉक्टरने २ ते ४ जूनदरम्यान आरोपीच्या बँक खात्यात सुमारे २.८९ कोटी रुपये पाठवले. त्यानंतरही त्यांनी डॉक्टरला अटक करण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी मुंबई सायबर पोलिसांशी संपर्क साधला.

१.२९ कोटी रुपये गोठवले

सायबर पोलिस पथकाने तातडीने कारवाई करत राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल (एनसीआरपी)वर गुन्हा नोंदवला. त्याचबरोबर संबंधित बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. त्यांच्या जलद प्रतिसादामुळे हस्तांतरित रकमेतून १.२९ कोटी रुपये गोठवले.

टॅग्स :fraudधोकेबाजीMumbaiमुंबईdigitalडिजिटलArrestअटकcyber crimeसायबर क्राइम