शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीवर दरोडा, आरोपीला पायावर गोळी झाडून सिनेस्टाईल अटक

By शिवराज बिचेवार | Updated: October 2, 2022 12:09 IST

उमरी तालुक्यातील सिंधी येथे काँग्रेसचे पदाधिकारी मारोतराव कवळे यांच्या क्रेडिट सोसायटीवर  शनिवारी दुपारी  दरोडा घालण्यात आला होता

नांदेड.- रविवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास मुदखेड तालुक्यातील वांगी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीच्या पायावर गोळी झाडून त्याला पकडले. बालाजी महाशेट्टे असे आरोपीचे नाव असून शनिवारी क्रेडिट सोसायटीवर घातलेल्या दरोड्यात त्याचा सहभाग होता. पोलिसांनी त्याच्याकडून लुटीतील दोन लाख रुपये जप्त केले.

उमरी तालुक्यातील सिंधी येथे काँग्रेसचे पदाधिकारी मारोतराव कवळे यांच्या क्रेडिट सोसायटीवर शनिवारी दुपारी  दरोडा घालण्यात आला होता. हातात तलवारी घेऊन सहा जण सोसायटीत घुसले होते. यावेळी त्यांनी संगणक तोडफोड केली तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण करून 2 लाख 4 हजार रुपये लंपास केले होते. पळून जाताना मात्र त्यातील मंजितसिह सिरपल्लीवाले हा दरोडेखोर दुचाकी वरून पडल्याने नागरिकांच्या हाती लागला होता. यावेळी नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या दरोडेखोरांच्या मागावर होते. रविवारी पहाटे मुदखेड तालुक्यातील वांगी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गस्त घालत होते. यावेळी त्यांनी एका संशयित दुचाकीस्वराला अडविण्याचा प्रयत्न केला असताना त्याने पोलिसांवर हल्ला केला. प्रत्त्युत्तरात पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडून पकडले. बालाजी महाशेट्टे असे आरोपीचे नाव असून दरोड्यात त्याचा सहभाग होता. त्याच्याकडून दरोड्यातील रक्कम जप्त करून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणात आणखी चार आरोपींचा शोध सुरू आहे.

असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक संशयित दुचाकी अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला, यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला. या आरोपीचा दरोड्यात समावेश होता. पोलिसांनी त्याच्याकडून लुटीतील दोन लाख रुपये जप्त केले असून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात आणखी चार आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिसRobberyचोरी