रेवणअप्पा साळेगावकर/राहुल खपले -सेलू / वालूर (परभणी) : सेलू तालुक्यातील वालूर येथील एका शेत आखाड्यावर व श्रीकृष्ण मंदिराजवळ अशा दोन ठिकाणी बुधवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी उच्छाद मांडला. यामध्ये एका घटनेत आजी गभीर जखमी झाली व नातवाची हत्या केली तर दुसऱ्या घटनेत वृध्द दाम्पत्य जखमी झाले. चोरट्यानी याचेकडील सोन्याचा ऐवज लूटून पोबारा केला अशी घटना पुढे आली आहे.वालूर येथे बुधवारी मध्यरात्री बोरी रस्त्यावर सोनवणे यांच्या आखाड्यावर अज्ञात चोरट्यांनी झोपेत असलेल्या आजी वच्छलाबाई सोनवणे व नातू संतोष आसाराम सोनवणे (वय 22, रा. वालूर) याना लोखंडी रॉड ने मारहाण केली यामध्ये सतोष चा जागीच मृत्यू झाला तर वच्छलाबाई गंभीर जखमी झाल्या त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरट्यानी घेतले तर याच परिसरातील श्रीकृष्ण मंदिरात असलेले दत्तराव भोकरे (वय 75) व सुरूबाई भोकरे (वय 70) या वृद्ध दांपत्यावरही हल्ला केला. चोरट्यांनी त्यांच्या कानातील आणि नाकातील दागिने हिसकावून घेतले. यात दत्तराव भोकरे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी परभणी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.तसेच, रामेश्वर विलास राठोड (रा. पार्डी) यांची मोटारसायकल चोरीला गेल्याचीही नोंद झाली आहे.या सलग दोन ठिकाणच्या दरोड्यांमुळे वालूर गावासह परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस निरीक्षक दिपक बोरसे याचे पथक घटनास्थळी धावले. त्यानतर पोलिस अधिक्षक रविद्रसिह परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुजाळ, उपविभाग पोलिस अधिकारी दिपककुमार वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी बेनीवाल, स्थागुशाचे पो. नि विवेकानंद पाटील याचेसह श्वान व फिगर पथक घटनास्थळी आले. भौतीक पुराव्यासह चोरट्याचा माग काढण्याचा पोलिसाचे प्रयत्न सुरू होते.पचनामा केल्यानंतर मयत सतोष सोनवणे याचा म्रतदेह उत्तरीय तपासणी साठी सेलू उपजिल्हा रुण्णालयात आणण्यात आला.
चार पथक तापासासाठी रवानापोलिसी अधिक्षक रविद्रसिह परदेशी याचे मार्गदर्शनाखाली घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पथक रवाना केले आहेत अशी माहीती पो. नि. दिपक बोरसे यानी दिली आहे.चोरट्याचा शोध लागल्यानतर घटने मागचे कारण आणि घटनाक्रम पुढे येईल अशी माहीती पोलिसांनी दिली.
वालूर येथील दराड्याची घटना व त्यात सतोष सोनवणे याची हत्या झाल्याने वालूर सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Summary : A robbery at Walur resulted in a youth's death and an elderly woman injured. A temple nearby was also targeted, with two injured and a motorcycle stolen. Police are investigating the incidents.
Web Summary : वालुर में एक डकैती में एक युवक की मौत हो गई और एक बुजुर्ग महिला घायल हो गई। पास के एक मंदिर को भी निशाना बनाया गया, जिसमें दो घायल हुए और एक मोटरसाइकिल चोरी हो गई। पुलिस मामले की जांच कर रही है।