शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

लातूरमध्ये सैन्यातील जवानाच्या घरावर दरोडा; १० तोळे सोने लंपास, दरोडेखोर पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 11:46 IST

पोलिसांनी पहाटे जिल्ह्यात नाकाबंदी लावली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले  आहे. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी पथके तैनात केली आहेत.

चाकूर (जि. लातूर) : सैन्य दलातील जवानाच्या घरावर दरोडा घालून १० तोळे सोने, दोन मोबाईलसह अन्य ऐवज दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना चाकूर तालुक्यातील लातूररोड येथे मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी पहाटे जिल्ह्यात नाकाबंदी लावली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले  आहे. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी पथके तैनात केली आहेत.अहमदपूर नजिक पोलिसांनी कार मधील दरोडेखोरांचा पाठलाग केला.तेव्हा दरोडेखोरांनी कार सोडून अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा  यशस्वी प्रयत्न केला आहे. चाकूर तालुक्यातील महाळंगी येथील सौदागर राजाराम चरक हे सध्या लातूररोड येथे घर बांधून राहतात.चरक सैन्य दलामध्ये जवान म्हणून आसाम राज्यात सेवा बजावत आहेत. ५ जूनला एक महिन्याच्या रजेवर ते गावी आले आहेत. दरम्यान, ४ जूलैला परत आसामला जाणार आहेत. मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घरासमोर चोरटे आलेची चाहूल चरक कुटूंबियांना लागली. खिडकीतून बाहेर पाहिले असता हतात बॅटरी घेऊन असलेले लोक दिसून आले. त्यावर चरक यांच्या कंम्पांउड मधून दरोडेखोरांनी प्रवेश केला. घराच्या मुख्य दरवाजाला धक्के देऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चरक कुटूंबियांना दोघांनी चाकूचा धाक दाखवून धमकाविले. तर अन्य दोघांनी घरातील एका कपाटातील सोन्याचे दागिने त्यात मिनी गंठण, लॉकेट, झुमके, सरपाळे असे दहा तोळ्याचे होते. दरोडेखोरांनी ते दागिने लंपास केले. जाताना चरक आणि त्यांच्या पत्नीचे मोबाईल दरोडेखोरांनी घेऊन गेले. घटना घडताच सौदागर चरक आणि शेजारी इरफान कोतवाल यांनी चाकूर पोलिसांत जाऊन घटनेची माहिती दिली. पोलिस उपविभागीय अधिकारी विद्यानंद काळे,पोलिस निरिक्षक सोपान सिरसाट,पोउपनि खंडू दर्शने,पोहेकॉ हणमंत आरदवाड,परमेश्वर राख,दत्तात्रय थोरमोठे,पिराजी पुट्टेवाड,तानाजी आरदवाड,सूर्यकांत कलमे आदींनी घटनास्थळी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. 

जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदी लावली.पोलिसांचे पथके दरोडे खोरांच्या शोधात रवाणा झाली. लातूर येथून श्वानपथकास पाचारण करण्यात आले. सकाळी श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लातूर ते नांदेड हा राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा माग दाखविला. दरम्यान, अहमदपूर येथे पोलिसांनी नाकाबंदी केली असता एका कारमधून दरोडेखोर जात असलेचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्या कारचा पाठलाग केला. आयटीआय भागात जाऊन चोरट्यांनी कार सोडून आंधाराचा फायदा घेत पसार झाले. कार (एम.एच.४४ बी १३४) असा आहे. ही कार २७ जून रोजी अंबाजोगाई येथून चोरीस गेली होती.असे पोलीस निरीक्षक सिरसाट यांनी सांगितले. तिच कार आता पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिस दरोडेखोरांच्या शोधात आहेत.

टॅग्स :Policeपोलिस