शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांना केवळ पाच दिवसांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 01:33 IST

रायते गावाजवळील कडबा कुटीच्या दुकानात शिरलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी दुकानमालकास बॅटने व तलवारीसारख्या हत्याराने ठार मारण्याचा प्रयत्न करत त्याच्याकडून पाच हजारांचा मोबाइल व दुकानातील ४० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना २० मार्चला घडली होती.

टिटवाळा : रायते गावाजवळील कडबा कुटीच्या दुकानात शिरलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी दुकानमालकास बॅटने व तलवारीसारख्या हत्याराने ठार मारण्याचा प्रयत्न करत त्याच्याकडून पाच हजारांचा मोबाइल व दुकानातील ४० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना २० मार्चला घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे, तसेच उर्वरित तिघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. वाहोली येथील रहिवासी मोतीसम शेंदू (४५) यांचे कल्याण- मुरबाड महामार्गावर रायते गावाजवळ दुकान आहे. २० मार्चला पहाटे ४.३५ वाजेच्या सुमारास  दुकानात चार चोरट्यांनी घुसून शेंदू यांना मारहाण केली. त्यानंतर मोबाइल व ४० हजार लंपास केले. तपासादरम्यान या गुन्ह्यातील चार व इतर पाच, अशा नऊ चोरट्यांनी पावशेपाडा व पांजारपोळ येथे दरोडा घालून जवळजवळ चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला असल्याची बाब टिटवाळा पोलिसांच्या निदर्शनास आली.  या घटनांतील दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी उपविभागीय अधिकारी, मुरबाड डॉ. बसराज शिवपुजे, टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी एक विशेष पथक स्थापन केले. तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील तीन आरोपींना अवघ्या पाच दिवसांत २५ मार्चला पारनेर येथून अटक केली.  कोठडीत केली रवानगी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार इतर तीन आरोपींना २८ मार्चला पारनेर येथून अटक करण्यात आली. त्यांना १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. यातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, तर १ एप्रिलला हजर केलेल्या तीन आरोपींना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी