शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेच्या हत्येचा उलगडा : घराचा दरवाजा उघडताच लुटारूचा महिलेवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 06:19 IST

दीड महिन्यापासून बंद असलेले घर पाहून घरफोडीचा डाव आखलेल्या आणि दरवाजा उघडताच समोर वृद्धेला पाहून बिथरलेल्या लुटारूने वृद्धेवर थेट हल्ला चढविला.

मुंबई : दीड महिन्यापासून बंद असलेले घर पाहून घरफोडीचा डाव आखलेल्या आणि दरवाजा उघडताच समोर वृद्धेला पाहून बिथरलेल्या लुटारूने वृद्धेवर थेट हल्ला चढविला. यात ६७ वर्षीय रुक्षमणी विसरीया यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी कृष्णगिरी निमगिरी (५५) याला अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईत ६ ते ७ गुन्हे दाखल आहेत. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या दिवशीच विसरीया या दीड महिन्यानंतर गुजरातच्या आश्रमातून घरी परतल्या होत्या.मुलुंड आर. आर. टी. रोड येथील त्रिवेदी भुवनमध्ये तळमजल्यावर त्या एकट्याच राहायच्या. त्याच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा मुलगा राहण्यास होता. पर्युषण काळात दीड महिन्यासाठी त्या गुजरातच्या पालीटाना येथील आश्रमात ज्येष्ठ सहकाऱ्यांसोबत गेल्या होत्या. ८ सप्टेंबर रोजी त्या घरी परतल्या. त्या घरात झोपलेल्या असतानाच रात्रीच्या सुमारास निमगिरी त्यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने गेला. मात्र, घरात विसरीयांना पाहून त्याने घाबरून जवळील स्क्रू ड्रायव्हरने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या गळ्यावर वार करत तो चोरी न करताच पसार झाला.या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह, साहाय्यक पोलीस आयुक्त पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी सरदेसाई यांच्या पथकाने या प्रकरणी परिसरात शोध सुरू केला.घरातून काहीच चोरीस गेले नव्हते. कुठलाही पुरावा हाती नसल्याने हत्येमागचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर, तपासाअंती यामागे निमगिरीचा हात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ठाण्यातून ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हत्या केल्याचे उघड झाले. तो बºयाच दिवसांपासून घराची रेकी करत होता. विसरीया या गुजरातला असल्याने घर बंद होते. त्यामुळे घरात कोणीही नसल्याचे समजून त्याने दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला. तो आवाज ऐकून विसरीयांनी दरवाजा उघडला आणि समोर त्यांना पाहून अटकेच्या भीतीने घाबरून त्यांची हत्या केल्याची माहिती निमगिरीने पोलिसांना दिली. या प्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत.निमगिरी सराईत गुन्हेगारनिमगिरी हा सराईत गुन्हेगार आहे. तो ठाण्यात राहतो. त्याच्याविरुद्ध मुंबईतच चोरी, घरफोडीचे ६ ते ७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध असे अनेक गुन्हे दाखल असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी