शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात मुलीच्या छेडछाडीतून दंगल; एकाचा मृत्यू, दोंडाईचा येथील प्रकार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 07:21 IST

Riots in Dhule district : अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून दोंडाईचा येथे बुधवारी रात्री झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला. संशयित आरोपींच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले.

दोंडाईचा (जि.धुळे) : अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून दोंडाईचा येथे बुधवारी रात्री झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला. संशयित आरोपींच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात दोन जखमी झाले आहेत. तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहे. (Riots over girl molestation in Dhule district; Death of one )बुधवारी रात्री दोन गटांत झालेल्या हाणामारीत शाहबाज शाह गुलाब शाह (४५) यांचा मृत्यू झाला. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दोंडाईचा येथील एका अल्पवयीन मुलीची छेड दोन मुलांनी काढली. हा प्रकार पीडित मुलीने तिच्या भावाला सांगितला. त्याने छेड कढणाऱ्या दोघा मुलांना चोप दिला. दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा पॉक्सो कायद्यान्वये दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याचवेळी संशयित आरोपींचे समर्थक मोठ्या संख्येेने पोलीस  ठाण्यात आले. जमावाने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व अन्य कर्मचाऱ्यांवर दडपण आणून आणण्यास सुरुवात केली. काही वेळातच वाद विकोपाला गेला. जमावाने दोन संशयितांना पोलिसांच्या ताब्यातून सोडवित पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी गोळीबार केला. यात दोघे जण जखमी झाले. जमावाच्या हल्ल्यात वारे यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करत असताना पुन्हा वाद निर्माण होऊन दोन गटांत हाणामारी झाली. यामध्ये दोंडाईचा येथील एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती कळताच  नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे घटनास्थळी दाखल झाले. दोंडाईचात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे