शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रिम्पल म्हणाली, "मी आईची हत्या नाही, फक्त तुकडे केले!" कोर्टात दिली माहिती, कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 11:13 IST

आई वीणा जैन यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या रिम्पलची पोलिस कोठडी सोमवारी संपुष्टात आली

मुंबई : दृश्यम चित्रपटातील अभिनेता अजय देवगणच्या डायलॉगप्रमाणे ‘मी हत्या केलीच नाही. २७ डिसेंबरला आई पडली. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे मी तुकडे केले’, असे रिम्पल जैन हिने न्यायालयात सोमवारी सांगितले. २७ डिसेंबरला वीणा जैन यांच्याबाबतीत नेमके घडले काय, याचे गूढ कायम असून या प्रकरणात अन्य कुणाचा हात आहे किंवा कसे, याच्या तपासासाठी रिम्पलच्या पोलिस कोठडीत २४ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली. 

आई वीणा जैन यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या रिम्पलची पोलिस कोठडी सोमवारी संपुष्टात आली. तिची कोठडीत वाढ करावी यासाठी रिम्पलला शिवडी कोर्टात न्यायाधीश एस. एस. घारे यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील वैशाली आगवणे यांनी तिच्या वाढीव कोठडीसाठी मागणी केली. आतापर्यंत गुन्ह्यांत वापरलेली शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ज्या दुकानातून हत्यारांची खरेदी झाली तेथेही तपास करण्यात आल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले.

या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, आणखी कुठल्या हत्यारांचा वापर झाला का, यासाठी रिम्पलच्या बोटांचे ठसे घेणे बाकी असल्याचे सांगत कोठडी वाढविण्याची मागणी कोर्टाला केली गेली. न्यायालयाने रिम्पलच्या कोठडीत २४ तारखेपर्यंत वाढ केली आहे. तपास अधिकारी सुदर्शन चव्हाण अधिक तपास करत आहेत.

रिम्पलचा आत्मविश्वास    यावेळी कोर्टाने रिम्पलला आईची हत्या का केली, असे विचारले असता तिने आपण हत्या केलीच नाही, असे कोर्टाला सांगितले.     २७ तारखेला आई पहिल्या मजल्यावरून खाली पडली. दोन मुलांनी तिला उचलून घरी आणले. त्याच, दिवशी तिचा मृत्यू झाला.    तिच्या मृत्यूचा आरोप माझ्यावर येईल, माझे घर जाईल, आईचे मामाकडे असलेले बँकेतील पैसे मिळणार नाही, या भीतीने तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे रिम्पलने सांगितले. आत्मविश्वासाने ती सर्व प्रश्नांची उत्तरे देत होती. 

सँडविच विक्रेत्याकडे सर्व माहिती हॉटेलच्या दोन मुलांनी वीणा जैन यांना उचलून घरी आणले तेव्हा त्या जिवंत होत्या, असे चौकशीत समोर आले. त्यानंतर काही वेळाने रिम्पलने सँडविच विक्री करणाऱ्या अमजद अली ऊर्फ बॉबी या मित्राला बोलावून घेतले. त्याने आईची नस पाहून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी