शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाला जबर मारहाण; रोकड, मोबाईलसह रिक्षाही पळविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 21:06 IST

Crime News : रिक्षा त्याठिकाणी आली असता तेथे आणखीन दोन प्रवासी आधी बसलेल्या प्रवाशांनी रिक्षात घेतले आणि रिक्षा पुर्वेतील काटेमानिवली येथे घेण्यास शेखला सांगितले.

कल्याण - जावेद शेख या रिक्षाचालकाला मारहाण करीत त्याच्याकडील मोबाईल रोकड आणि रिक्षा घेऊन पोबारा करणा-या पाच पैकी चौघा आरोपींना अवघ्या सहा तासात अटक करण्यात कोळसेवाडी पोलिसांना यश आले आहे. चार आरोपींमध्ये एक जण अल्पवयीन असून अन्य एकजण फरार आहे.अंबरनाथमध्ये राहणारा शेख बुधवारी रात्री 10 वाजता तेथील साईबाबा मंदिर जुना बस स्टॅण्डजवळ असताना एक महिला आणि पुरूष प्रवाशी त्यांच्या रिक्षात बसले आणि त्यांनी रिक्षा कल्याण पूर्वेकडील रेल्वे कवॉटर येथे घेण्यास सांगितले. रिक्षा त्याठिकाणी आली असता तेथे आणखीन दोन प्रवासी आधी बसलेल्या प्रवाशांनी रिक्षात घेतले आणि रिक्षा पुर्वेतील काटेमानिवली येथे घेण्यास शेखला सांगितले.

शेख रिक्षा काटेमानिवली पूलाकडे घेऊन जात असताना रिक्षात बसलेल्या चौघांपैकी एकाने त्याला चाकू दाखवून दमदाटी केली आणि ड वॉर्ड जवळील रस्त्यावर रिक्षा थांबविण्यास सांगितली. रिक्षा थांबविताच त्याठिकाणी आणखीन एक व्यक्ती आली आणि सर्वानी शेख याला मारहाण करण्यास सुरूवात केली. लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण केली गेली. यात शेख गंभीर जखमी झाले. याचा फायदा उठवित संबंधितांनी त्यांच्या खिशातील मोबाईल, 500 रूपये रोकड असलेली पर्स चोरली त्याचबरोबर शेख यांची रिक्षा देखील पळवून नेली. याप्रकरणी शेख यांनी कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठत पाच जणांविरोधात तक्रार दिली होती. दरम्यान सहा तासांच्या आत सहाय्यक पोलिस निरिक्षक हरीदास बोचरे पाटील यांच्या पथकाने सीसीटिव्हीच्या आधारे पाच पैकी चार आरोपींना अटक केली. आरोपी उल्हासनगरमधील राहणारे आहेत. मुख्य आरोपी करण दखनी हा उल्हासनगरमधील सराईत गुन्हेगार आहे. त्याची पत्नी चैताली पाटील आणि मित्र कुणाल जाधव याचाही अटक आरोपींमध्ये समावेश आहे. अन्य एक अटक आरोपी अल्पवयीन असून त्याची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहीती बोचरे पाटील यांनी दिली.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसkalyanकल्याणArrestअटकRobberyचोरी