शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

रियाने जाण्यापूर्वी आठ हार्ड डिस्क केल्या नष्ट; ईडीच्या चौकशीत झाला अनेक बाबींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 02:50 IST

सुशांतकडून जया सहाने घेतले १० कोटी; जाहिरातीच्या कमिशनपोटी ही रक्कम मिळाल्याचे दिले स्पष्टीकरण

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतकडून टॅलेंट मॅनेजर म्हणून काम केलेल्या जया सहाने दहा कोटी रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात वेळोवेळी सुशांतच्या बँक खात्यावरून ही रक्कम तिच्या बँक खात्यावर हस्तांतर करण्यात आली. सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी केलेल्या तपासातून ही बाब समोर आली असून जाहिरातीच्या कमिशनपोटी ही रक्कम मिळाल्याचा जबाब तिने अधिकाऱ्यांना दिला आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित रिया चक्रवर्तीच्या मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅटनुसार, जया सहाशी तिचे सुशांतला ड्रग्ज देण्याबाबतचे संभाषण समोर आले आहे. त्याअनुषंगाने ईडीने जयाची सुमारे सहा तासांहून अधिक काळ चौकशी केली. आवश्यकतेनुसार तिला पुन्हा चौकशीला बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जया ही सुशांतकडे वर्षभरापासून टॅलेंट मॅनेजर म्हणून काम पाहत होती. त्याला चित्रपट व जाहिरातीसाठी काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी तिच्यावर होती. त्यापूर्वी दिशा सालियन हे काम करीत होती. जयाने या कालावधीत सुशांतकडून १० कोटी कमावल्याचे बँक खात्यातील नोंदीवरून स्पष्ट झाले. या कामासाठी कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाच्या सरासरी ३ ते ५ टक्के रक्कम कमिशन म्हणून घेतली जाते. त्यामुळे सुशांतने गेल्या वर्षभरात किती जाहिराती केल्या, याचा सविस्तर तपशील तिच्याकडून मागविण्यात आला आहे. जरी १० टक्के कमिशन गृहीत धरले तरी त्यासाठी एका वर्षात सुशांतने १०० कोटींच्या जाहिराती केल्या पाहिजेत. मात्र तितकी त्याची मिळकत नव्हती. त्यामुळे जयाने १० कोटी का घेतले, याबाबत चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.रियाने जाण्यापूर्वी आठ हार्ड डिस्क केल्या नष्टसीबीआय चौकशीत सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीने रियाने सुशांतचे घर सोडण्यापूर्वी ८ हार्ड डिस्क नष्ट केल्याचे सांगितले. रियाने जाण्यापूर्वी ३ आयटी तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यापैकी एक जण घरी आला होता. त्यानेच घरातील ८ हार्ड डिस्क नष्ट केल्या. या वेळी तेथे रिया, सुशांत, दीपेश, नीरज उपस्थित होते, असेही सिद्धार्थने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात रियानेच त्यांना बोलावल्याचा संशय त्यांनी वर्तविल्याचे समजते. हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या परदेश दौऱ्यांसह दोघांच्या कंपन्यांची महत्त्वाची कागदपत्रे होती, असा संशय आहे. मात्र रियाने हे आरोप फेटाळले आहेत.सुशांत करत होता चरसचे सेवनसुशांतचा बॉडीगार्ड मुश्ताक शेखने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत, सुशांत चरसचे सेवन करत असल्याचे सांगितले आहे. शेख हा २०१८ ते २०१९ दरम्यान सुशांतचा बॉडीगार्ड होता. त्या वेळेस अनेकदा सुशांत चरसचे सेवन करत असे. याच काळात रिया सुशांतच्या आयुष्यात आली होती. नेहमीच वाहनात चरस नसेल याची खबरदारीही तो घेत होता, जेणेकरून तो पोलीस तपासात अडकू नये, असे या बॉडीगार्डने सांगितले.रिया म्हणते, जीवाला धोका!रियाने सोशल मीडियावर घराजवळ जमलेल्या गर्दीचा व्हिडीओ शेअर केला आहे. आम्ही तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. मात्र आमच्या जीवाला धोका असून मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केल्याचे नमूद केले आहे.रियाच्या मते, सुशांतला वाटायची विमानात बसायची भीती, सुशांत प्लेन उडवितानाचा व्हिडीओ अंकिताने केला व्हायरलसुशांतप्रकरणी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेल्या रियाने आपल्या युरोप सहलीबाबत सांगताना, सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया असल्याने विमानात बसण्याची भीती वाटत होती. त्यावर तो औषधे घेत असल्याचे सांगितले. मात्र त्यावर सुशांतची मैत्रीण अंकिता लोखंडे हिने सुशांत प्लेन उडवितानाचा व्हिडीओ शेअर करून रियाचा दावा खोडून काढला. रियाने दिलेल्या माहितीत सुशांत विमान प्रवासापूर्वी मोडाफिनिलनावाचे औषध घ्यायचा, असे म्हटले आहे. तर अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओत, ‘हा क्लॉस्ट्रोफोबिया आहे का? तुला नेहमी उंच उडायचे होते आणि तू ते केलस सुद्धा’ असे म्हटले आहे.रिया-सुशांतमध्ये झाले होते कडाक्याचे भांडणरियाने ८ जूनला सुशांतचे घर सोडले, त्या वेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्याची रूम आतून लॉक असल्याने केवळ आरडाओरड ऐकू येत होती. रिया घरातून बाहेर जाताना तिचे डोळे सुजले होते, असा जबाब नोकर नीरज सिंहने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत