शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुलींनंतर मुलगा झाला अन् वडिलांनी उचललं धक्कादायक पाऊल; ऐकून सर्वांचाच थरकाप, संपूर्ण गाव सुन्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:27 IST

रिवा जिल्ह्यात अंधश्रद्धेतून घडलेल्या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला आहे. देवीला प्रसन्न करण्यासाठी एका युवकाचा बळी दिला गेल्याचा प्रकार उघडीकस आला आहे.

रिवा-

रिवा जिल्ह्यात अंधश्रद्धेतून घडलेल्या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला आहे. देवीला प्रसन्न करण्यासाठी एका युवकाचा बळी दिला गेल्याचा प्रकार उघडीकस आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेनं सर्वच सुन्न झाले आहेत. नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार रिवा जिल्ह्यातील वैकुंठपूर ठाणे हद्दीतील आहे. 

गेल्या आठवड्यात एका तरुणाचा मृतदेह गावातील देवीच्या मंदिराच्या आवारात आढळून आला. मृतदेहाशेजारी रक्तानं माखलेली कुऱ्हाड देखील आढळून आली होती. त्यामुळे प्रथमदर्शनी हा प्रकार नरबळी असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यानुसार चौकशीला सुरुवात केली. 

वैकुंठपूर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपी रामलाल प्रजापती याला अटक केली आहे. त्याची चौकशी केल्यानंतर त्यानं जी कहाणी सांगितली ती मन हेलावणारी होती. आरोपी सध्या तुरुंगात आहे. सलग तीन मुली झाल्यामुळे नाखुश असलेल्या रामलाल यानं पुत्र प्राप्तीसाठी देवीकडे मन्नत मागितली होती. जर मुलगा झाला तर नरबळी तुला चढवेन अशी मन्नत रामलाल यानं केली होती. इच्छा पूर्ण झाल्यानंतर रामलाल यानं गावातील एका तरुणाची कुऱ्हाडीनं हत्या करुन त्याचा मृतदेह मंदिरात आणून ठेवला आणि तिथून तो फरार झाला. 

मंदिराजवळ सापडला मृतदेहवैकुंठपूर पोलीस ठाण्याच्या बेधुआ गावात असलेल्या देवीच्या मंदिरात सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी खळबळजनक खुलासा झाला आहे. बेधुआ गावात एका चबुतऱ्यावर देवीची मूर्ती बसवण्यात आली आहे. 6 जुलै रोजी मंदिराजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी मृतदेहाची ओळख पटली आणि त्याचं नाव दिव्यांश कौल असल्याचं समोर आलं. चौकशीदरम्यान पोलिसांना कळले की, गावातील रामलाल प्रजापती हे दिव्यांशसोबत शेवटचे दिसले होते. संशयाच्या आधारे रामलालला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता, या घटनेतील भयानक सत्य समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrewa-pcरीवा