शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

अपमानाचा घेतला बदला, कशेळीतील कोकाटे खून प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 09:34 IST

गणेशने आठ वर्षांपूर्वी मारहाण करून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीतून त्याचा खून केल्याची कबुली धनराजने पोलिसांना दिली.

ठाणे : कशेळीतील माथाडी कामगारांचा ठेकेदार गणेश कोकाटेचा खून करणाऱ्या धनराज तोडणकर (३३, रा. इंदिरानगर, ठाणे) आणि त्याचा साथीदार संदीपकुमार  कनोजिया (२७, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. गणेशने आठ वर्षांपूर्वी मारहाण करून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीतून त्याचा खून केल्याची कबुली धनराजने पोलिसांना दिली.

भिवंडीतील कशेळी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ कोकाटे याच्यावर मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी गोळी झाडून हत्या केल्याची घटना ८ डिसेंबर २०२२ रोजी घडली होती. नारपोली पोलिस ठाण्यात हत्यार कायद्यासह खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस आयुक्त जयजित सिंह आणि सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिले होते.

ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पाच पथकांसह नारपोली पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू होता. कोकाटे याच्यावर गणेश इंदुलकर  याने माथाडींच्या ठेक्यातील वादातून सप्टेंबर २०२२ मध्ये गोळीबार केला होता. यात तो बचावला होता. या प्रकरणात इंदुलकर वगळता चौघांना गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. त्यामुळे यावेळीही इंदुलकरनेच गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज होता. प्रत्यक्षात यातील आरोपी वेगळेच असल्याचे सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्पष्ट झाले. दरम्यान, धनराज हा ठाण्यातील इंदिरानगर नाका येथे येणार असल्याची माहिती युनिट पाचचे सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) भूषण शिंदे यांना मिळाली. 

अर्धनग्न करीत केली होती मारहाण कोकाटे याने सन २०१४ मध्ये धनराजविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. हा खोटा गुन्हा असल्याचा धनराजचा दावा होता. गणेश याच्यासह १० ते १५ जणांनी इंदिरानगर भागात धनराजला अर्धनग्न करीत जबर मारहाण केली होती. याच अपमानाची सल धनराजच्या मनात होती. या रागातून त्याने गणेशचा खून केल्याची कबुली दिली. तोडणकर याच्याविरुद्ध श्रीनगर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असून त्याला एका गुन्ह्यात न्यायालयाने फरार घोषित केले आहे, असे पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी