शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: निवृत्त पोलिसाकडून दोन मुलांवर गोळीबार; ऐरोलीतली घटना, एकाची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 07:18 IST

भगवान यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. त्यांनी या पिस्तूलद्वारे काही महिन्यांपूर्वी मेहुणा व माजी नगरसेवक राजू पाटील यांनादेखील धमकावले होते, असेही समजते. यावेळी पोलिसांनी त्यांचे पिस्तूल जप्त केल्यानंतर पुन्हा ते ताब्यात दिले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सेवानिवृत्त पोलिसाने स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्याची घटना सोमवारी ऐरोली येथे घडली. यामध्ये मोठ्या मुलाला तीन गोळ्या लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून, दुसऱ्या मुलाच्या शरीराला घासून गोळी गेली आहे. घटनेनंतर रबाळे पोलिसांनी वडिलाला पिस्तुलासह ताब्यात घेतले असून, गोळीबार करण्यामागच्या कारणांची चौकशी सुरू आहे.

सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऐरोली सेक्टर ३ येथील रो हाऊसमध्ये ही घटना घडली. त्या ठिकाणी राहणाऱ्या भगवान पाटील या निवृत्त सहायक उपनिरीक्षक यांनी वसई येथे राहणाऱ्या स्वतःच्या मोठ्या मुलाला काही कामानिमित्त घरी बोलावून घेतले होते. त्यानुसार मोठा मुलगा विजय हा घरी आला होता. यावेळी लहान मुलगा सुजय हा घरात होता. त्यानंतर काही वेळातच भगवान यांनी स्वतःकडील पिस्तूलमधून विजय याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी विजयच्या पोटात घुसली असून, दुसरी गोळी खांद्यातून आरपार गेली आहे, तर तिसरी गोळी हाताला लागून गेली. त्यानंतर भगवान यांनी लहान मुलगा सुजय याच्यावर गोळी झाडली असता  त्याने स्वतःच्या बचावाचा प्रयत्न केल्याने त्याच्या पोटाला गोळी घासून गेली.

भगवान हे निवृत्त पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी त्यांचे जप्त केले पिस्तूल पुन्हा त्यांना ताब्यात दिले होते. याच पिस्तूलमधून त्यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला. त्यात मोठा मुलगा विजय याची प्रकृती चिंताजनक आहे. रबाळे पोलिसांनी भगवान पाटील यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्तूल देखील जप्त केले आहे. कोणत्या कारणासाठी त्यांनी हा गोळीबार केला याची चौकशी पोलीस करीत आहेत.

मेहुण्यालाही धमकावले होतेभगवान यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. त्यांनी या पिस्तूलद्वारे काही महिन्यांपूर्वी मेहुणा व माजी नगरसेवक राजू पाटील यांनादेखील धमकावले होते, असेही समजते. यावेळी पोलिसांनी त्यांचे पिस्तूल जप्त केल्यानंतर पुन्हा ते ताब्यात दिले होते. 

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिस