शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बँकेचा फाेन नंबर ‘गुगल’ करणे पडले पाच लाखांना; निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:48 AM

अनोळखी नंबरवरून काॅल करून एका व्यक्तीने त्यांना चार लाख ८६ हजार ९३९ रुपयांना गंडा घातला आहे.

अंबरनाथ : गुगलवरून बँकेचा नंबर शाेधून त्यावरून काॅल करणे बदलापूर शहरातील निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. त्यानंतर अनोळखी नंबरवरून काॅल करून एका व्यक्तीने त्यांना चार लाख ८६ हजार ९३९ रुपयांना गंडा घातला आहे. हा प्रकार १६ जानेवारीला घडला आहे. याबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.यादवनगर परिसरात राहणारे निवृत्त लष्करी कर्मचारी प्रमोद मर्चंडे यांचे एसबीआय बँकेचे ऑनलाइन बँकिंग ॲप चालत नसल्याने त्यांनी गुगलवर शोध घेऊन कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांनी टोलफ्री नंबरवर कॉल करून बँकेचे ऑनलाइन ॲप चालू होत नसल्याची माहिती दिली. ही माहिती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना कॉल आला. त्यावेळी त्यांच्याकडून सर्व अकाउंटचे डिटेल्स घेतले. त्यानंतर त्यांना एनी डेस्क हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. मर्चंडे यांनी हे अप्लिकेशन डाउनलोड केल्यावर कॉल केलेल्या अनाेळखी व्यक्तींनी बँकेचा रजिस्टर मोबाइल नंबर बदलला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून चार लाख ८६ हजार ९३९ रुपये काढून घेतले.मेसेजकडे दुर्लक्ष भाेवलेनंबर बदलल्याचा मेसेजही मर्चंडे यांना आला होता. बँकेचा कर्मचारी असल्याने त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तीन दिवसांनंतर बँक बॅलन्स चेक केल्यानंतर खात्यावर अठराशे रुपये असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी बँकेत संपर्क साधला असता त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचा बँकेने फॉर्म भरून घेत त्यांना पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले.